मुंबई: मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) एका विकासकावर पुनर्विकसित होत असलेल्या इमारतीतील रहिवाशांची त्यांच्या संमतीशिवाय फ्लॅट विकून त्यांची ५५ कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे, असे पोलीस अधिकाऱ्यांनी (Mumbai Police) बुधवारी सांगितले.
पीटीआयच्या वृत्तानुसार, अमरजित शुक्ला आणि त्यांची कंपनी मिड सिटी हाईट्स यांची पश्चिम उपनगरातील वर्सोवा (Versova), अंधेरी (Andheri) येथील यारी रोड येथे इमारतीचा पुनर्विकास करण्यासाठी निवड करण्यात आली होती. त्यांनी रहिवाशांना निर्धारित वेळेत घरे देण्याचे आश्वासन दिले होते.
या इमारतीमध्ये 13 रहिवाशांच्या मालकीचे 14 फ्लॅट होते.