अंधेरी- शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांची नुकतीच उत्साहात साजरी करण्यात आली. शिवसेना – युवासेना(Shivsena UBT) शाखा क्रमांक ७९ ने देखील बाळासाहेब ठाकरे यांची जयंती उत्साहात साजरी केली. शाखेतर्फे शनिवार २५ जानेवारी रोजी मेघवाडी, जोगेश्वरी (Jogeshwari)येथील नितिमा फाउंडेशन मधील विशेष बालकांना (Special Child) शालेय वस्तूंचे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी प्रताप मुळीक – उपविभागप्रमुख, सुनीता इलावडेकर – महिला उपविभाग संघटक, अनंत भुते – शाखाप्रमुख, मधुकर जुवाटकर – शाखासमन्वयक, शुभम कर्पे – युवासेना उपविधानसभा चिटणीस, वैभव पवार – शाखाधिकारी, आशिष कांदू – माजी युवा शाखाधिकारी, चेतन पुजारी – माजी युवा शाखासमन्वयक, किरण सोडवे – गटप्रमुख, मनीष पेंडुरकर – गटप्रमुख, दत्ताराम इंगावले – गटप्रमुख आदी पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी आयोजक कृणाल रामचंद्र नाईक, युवासेना शाखासमन्वयक यांनी कार्यक्रम आयोजित करण्याकरिता संधी दिल्याबद्दल नीतिमा फाउंडेशनच्या संस्थापक सायली मसुरकर यांचे शिवसेना शाखा क्रमांक ७९ च्या वतीने आभार मानले.