विरार: डिपार्टमेंट ऑफ लाईफ लाँग लर्निग अँड एक्स्टेन्शन (डीएलएलई), मुंबई विद्यापीठ आणि विवा महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने “उडाण” या विद्यापीठस्तरीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाला डॉ. कुणाल जाधव( प्राध्यापक, डीएलएलई, मुंबई विद्यापीठ) आणि श्री. सचिन राऊत ( सहाय्यक प्राध्यापक, डीएलएलई, मुंबई विद्यापीठ), विवा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.वी.श. अडिगल, उप प्राचार्या डॉ. प्राजक्ता परांजपे, उपप्राचार्या डॉ. दीपा वर्मा मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाला पालघर जिल्ह्यातून एकंदरीत 17 महाविद्यालयातील 300 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन महाविद्यालयाचे प्रतिनिधित्व केले.
विद्यार्थ्यांची सर्जनशीलता, संवेदनशीलता आणि सामाजिक जबाबदारी दर्शविणे हे या कार्यक्रमाचे मुख्य उद्दीष्ट होते. उडाण फेस्टिव्हलमध्ये पोस्टर मेकिंग, पथ नाट्य, सर्जनशील लेखन आणि वादविवाद स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा अश्या विविध प्रकारच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. विद्यार्थ्यांनी विविध महत्त्वाच्या विषयांवर सादरीकरण करून सामाजिक विचार, विचारशील चर्चा, नाविन्यपूर्ण कल्पनांना आधोरेखित केले.
विद्यापीठाच्या विविध कार्यक्रमात क्षेत्र समन्वयक म्हणून जबाबदारी पार पाडणाऱ्या उप प्राचार्या डॉ. दीपा वर्मा यांचा कार्यक्रमात विशेष योगदानाबद्दल मुंबई विद्यापीठाच्या डीएलएलई द्वारे सत्कार केला गेला. या कार्यक्रमाची व्यवस्था डीएलएलई समितीचे प्रमुख विकास गुप्ता, समिती सदस्य डॉ.रोहन गवाणकर, विनोद कुमार डीडवाना, तन्वी बोरे, देवेश माची, विद्यार्थी वर्ग यांनी केली होती.