MY ANDHERI NEWS

Your friendly community news portal

MY ANDHERI NEWS

MY ANDHERI NEWS

NEWS

महायुतीचे उमेदवार मुरजी पटेल यांची सुभाष नगर मध्ये चौक सभा संपन्न

अंधेरी- विधानसभा निवडणुकीसाठी शेवटचे काही दिवस शिल्लक आहेत. महाराष्ट्रात एकूणच प्रचाराचा ज्वर वाढलेला दिसत आहे. अंधेरी पूर्व विधानसभा मतदार संघात देखील प्रत्येक उमेदवार जोरदारपणे आपला प्रचार करत आहे. येथील महायुतीचे उमेदवार मुरजी पटेल यांनी नुकतीच चौक सभा घेतली. अंधेरी पूर्व येथील सुभाष नगर क्र. २ व बिंद्रा कॉम्प्लेक्स या ठिकाणी या चौक सभेचे आयोजन करण्यात आले होते.

मराठी व उत्तर भारतीय मतदारांची याठिकाणी संख्या जास्त आहे. झोपडपट्टी पुनर्वसनाचा मुद्दा येथे महत्वाचा आहे. त्याचप्रमाणे पाण्याची समस्या देखील प्रमुख समस्या आहे. यावेळी मुरजी पटेल यांनी मतदारांशी संवाद साधला.