मुंबई : साकीनाका(Sakinaka) येथे शनिवारी झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उभ्या असलेल्या पाण्याच्या टँकरखाली सदर इसम झोपला होता. टँकर चालकाने गाडी सुरू केल्यानंतर झोपलेला इसम गाडीखाली आला. पोलिसांनी चालक कन्हैयालाल यादव (४३) याच्याविरुद्ध बेदरकारपणे गाडी चालवल्याबद्दल एफआयआर नोंदवला आहे.
अंधेरी-घाटकोपर लिंक रोडवरील(Andheri Ghatkopar Link Road) सीएनजी पेट्रोल पंपाजवळ ही घटना घडली. अतुल कांबळे असे मृताचे नाव असून तो घाटकोपर(Ghatkopar) येथील रहिवासी आहे. मृतक त्याचा भाऊ मिलिंदसोबत राहत होता. शवविच्छेदनानंतर कांबळेचा मृतदेह मिलिंदच्या ताब्यात देण्यात आला.