मुंबई: नागपूरमध्ये अलिकडेच झालेल्या हिंसक संघर्षांनंतर, मुंबई पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे. ते सध्या हाय अलर्टवर आहेत. याचाच एक भाग म्हणून ईद(Ramzan Eid) आणि गुढी पाडवा(Gudhi Padwa) या आगामी सणांच्या आधी, एमआयडीसी पोलिसांनी शनिवारी मरोळ मापखान नगरच्या संवेदनशील भागात मॉक ड्रिल आणि रूट मार्च आयोजित केले. कायदा आणि सुव्यवस्थेचा कोणताही अडथळा निर्माण झाल्यास तयारीचा आढावा घेण्यासाठी दंगल नियंत्रण पथकाने(Riot control unit) या कवायती केल्या.
एबीपी न्यूजच्या वृत्तानुसार, एमआयडीसी(MIDC Police station) आणि अंधेरी पोलिस ठाण्यांच्या (Andheri Police station) सहभागासह, संवेदनशील भाग असलेल्या अंधेरी पूर्वमध्ये ही कवायत घेण्यात आली. अधिकारी आणि अग्निशमन दलाच्या(Mumbai fire brigade) कर्मचाऱ्यांसह सुमारे 60 ते 70 पोलिस कर्मचाऱ्यांनी या सरावात भाग घेतला. नागपूर हिंसाचारासारखी(Nagpur riots) परिस्थिती हाताळण्यासाठी रिअल-टाइम आपत्कालीन प्रतिसादाचे अनुकरण करणे हा या कवायतीचा उद्देश होता. कोणत्याही संभाव्य अशांततेचे प्रभावीपणे व्यवस्थापन करण्यासाठी पोलिसांनी जलद तैनाती आणि नियंत्रण धोरणांचा सराव केला.
रमजान ईद, गुढी पाडवा जवळ येत असताना, काही भागामध्ये पुन्हा तणाव वाढू शकतो अशी भीती अधिकाऱ्यांना वाटत आहे. कोणत्याही प्रकारचा अडथळा येण्याची शक्यता असल्याने, कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी संवेदनशील भागात अतिरिक्त पोलिस दल तैनात करण्यात आले आहे, असे फ्री प्रेस जर्नलच्या वृत्तांत म्हटले आहे.