MY ANDHERI NEWS

Your friendly community news portal

MY ANDHERI NEWS

MY ANDHERI NEWS

NEWS

मुरजी पटेल यांच्या आमदार निधीतून मरोळमध्ये गटार बनविण्याचे कार्य जोरात

अंधेरी- प्रभाग क्रमांक ७५, मरोळ विभागातील मंगू म्हात्रे चाळ येथे आमदार मुरजी पटेल यांच्या आमदार निधीतून पावसाच्या पाण्याच्या निचऱ्यासाठी तीन गटार बनविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. हा भाग सखल असल्याने येथे पावसाचे पाणी नेहमी साचते. जोरदार पर्जन्यवृष्टी झाली तर घरांत देखील पाणी शिरते. अनेक वर्षांपासून येथील रहिवाशी या समस्यांना तोंड देत आहे. या रहिवाश्यांनी काही दिवसांपूर्वी अंधेरीचे भाजप नेते उमेश राणे यांची भेट घेऊन आपली कैफियत मांडली. आमदार मुरजी पटेल यांच्याशी सल्लामसलत करून आपण समस्या निवारण करू असे आश्वासन उमेश राणे यांनी रहिवाश्यांना दिले.

दरम्यान उमेश राणे यांनी आमदार पटेल यांची भेट घेऊन सदर समस्या त्यांच्या कानी घातली. आमदार पटेल यांनी आपल्या आमदार निधीतून सदर प्रश्न सोडविण्याच्या सूचना दिल्या. प्रशासकीय यंत्रणा कामाला लागल्या. सध्या मंगू म्हात्रे चाळ येथे तीन गटार बनविण्याचे काम सुरू आहे.

‘’मंगू म्हात्रे चाळ येथील रहिवाशी दरवर्षी पावसाचे पाणी साचण्याच्या समस्येने त्रासून गेले आहेत. या समस्येविषयी जेव्हा आमदार मुरजी पटेल यांना सांगितले तेव्हा त्यांनी आपला आमदार निधीतून निधी मंजूर करत यंत्रणांना तात्काळ समस्या दूर करण्याचे निर्देश दिले. लवकरच या ठिकाणी तीन गटार बनवले जातील. यावेळी आमदार मुरजी पटेल यांच्या कार्यतत्परतेमुळे मंगू म्हात्रे चाळीतील रहिवाशांना पावसाच्या पाण्यापासून सुटका मिळेल हे निश्चित.’’ असे भाजप नेते उमेश राणे यांनी म्हटले.

उमेश राणे यांनी केलेल्या पाठ्यपुराव्यामुळेच हे शक्य झाले अशी भावना येथील नागरिक व्यक्त करत आहेत.

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *