अंधेरी – मुंबईतील पहिल्या भूमिगत मेट्रो – कुलाबा-वांद्रे-सीप्झ(Kurla-Bandra-Seepz) मेट्रो ३(Metro3) च्या आरे (Aarey) ते बीकेसी(BKC) या १२.४ किमी लांबीच्या मरोळ नाका स्थानकाचे नाव बदलण्याची मागणी ईस्ट इंडियन समाजाने केली आहे. स्थानिक गावातील इतिहासाचे प्रतिबिंबित करणारी नावे मेट्रो स्थानकांना देण्याच्या मोहिमेचा हा एक भाग आहे.
मुंबईतील गावांमधील मूळ रहिवाशांचे प्रतिनिधित्व करणारे मुंबई भूमिपुत्र ईस्ट इंडियन समाज(East Indian Community) आणि मोबाई गावठाण पंचायत यांनी विद्यानगरीचे नाव कोले कल्याण, सीप्झचे कोंडिविटा(Kondivita), टी२ विमानतळ(T2 Airport) स्थानकाचे सहार(Sahar) करावे असे म्हटले आहे.
मेट्रो ३ वरील सांताक्रूझ (पूर्व)(Santacruz east) स्थानकाचे नाव जवळच्या गावाच्या नावावरून वाकोला(Vakola) असेच ठेवावे अशी मागणी देखील ईस्ट इंडियन समाजाने केली आहे.
ही मागणी मोबाई गावठाण पंचायत या सामुदायिक गटाने गुरुवारी, १६ जानेवारी रोजी मुंबईच्या खासदार वर्षा गायकवाड(MP Varsha Gaikwad) यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.