WhatsApp Image 2025 01 16 At 14.16.37

‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ संकल्पनेतून विद्यार्थ्यांना दिले प्रोत्साहन

विरार : “वाचाल तर वाचाल” हे ब्रीदवाक्य आपण अनेकदा वाचले असेल.. पुस्तकं माणसाला समृध्द करतात. उज्वल भवितव्याचा मार्ग दाखवितात. वाचनाचे असलेले मानवी जीवनातील महत्व अधोरेखित करण्यासाठी विवा महाविद्यालयात ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ या संकल्पने अंतर्गत ग्रंथालय विभागाने दि. १० जानेवारी ते १५ जानेवारी दरम्यान विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन केले होते. या उपक्रमांतर्गत सुडोकू, बुक रिव्ह्यू, JAM (Just A Minute/Pick and Speak), जाहिराती विश्लेषण तसेच प्रश्नमंजुषा स्पर्धा (QUIZ COMPETITION) अशा विविध स्पर्धा घेण्यात आल्या.

WhatsApp Image 2025 01 16 At 14.16.16या उपक्रमांमध्ये ३५९ स्पर्धकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला, ज्यामुळे संपूर्ण महाविद्यालयात स्पर्धात्मक वातावरण आणि वाचन संस्कृतीला प्रोत्साहन मिळाले. या स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांच्या वाचन क्षमतांचे तसेच त्यांच्यातील सर्जनशीलतेचे दर्शन घडले.

दिनांक १५ जानेवारी २०२५ रोजी पारितोषिक वितरण समारंभाने या उपक्रमांचा यशस्वी समारोप करण्यात आला. या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वी.श. अडीगल ,उपप्राचार्या डॉ. प्राजक्ता परांजपे, उपप्राचार्या व आयक्युएसी समन्वयक डॉ. दीपा वर्मा उपस्थित होत्या. उपस्थित मान्यवरांनी या उपक्रमाचे कौतुक करताना विद्यार्थ्यांच्या सक्रिय सहभागाचे आणि ग्रंथालय विभागाच्या योगदानाचे विशेष अभिनंदन केले.

WhatsApp Image 2025 01 16 At 14.16.38‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ या उपक्रमामुळे वाचनाचे महत्त्व अधोरेखित झाले असून, अशा स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला चालना मिळाली. हा उपक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी विष्णू वामन ठाकूर चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष माननीय श्री. हितेंद्रजी ठाकूर, संस्थेच्या सेक्रेटरी अपर्णा ठाकूर, संस्थेचे खजिनदार शिखर हितेंद्रजी ठाकूर, व्यवस्थापन समितीचे सदस्य संजीव पाटील, संजय पिंगुळकर, एस.एन पाध्ये, विवा महाविद्यालयाचे समन्वयक नारायण कुट्टी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या उपक्रमाचे चे नियोजन ग्रंथालय विभागाचे प्रमुख डॉ. नागरत्ना पलोटी , ग्रंथालय समिती , ग्रंथालयातील कर्मचारी, विद्यार्थी वर्ग यांनी केले.