विरार : शिवजयंती निमित्त विरारच्या विष्णू वामन ठाकूर चॅरिटेबल ट्रस्ट, उत्कर्ष विद्यालय, पूर्व प्राथमिक व प्राथमिक विभागात शिव महोत्सव साजरा करण्यात आला. पारंपारिक वेशभूषेत नटून आलेल्या १५०० विद्यार्थ्यांनी शिवमय वातावरणात महाराजांना मानवंदना दिली.
मुख्याध्यापिका श्रीमती भक्ती वर्तक मॅडम यांच्या मार्गदर्शना खाली छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची पूजा करून महाराजांचा आगमन सोहळा पार पडला. जय भवानी, जय शिवाजी शिवगर्जनेच्या जयघोषात परिसर दुमदुमला.

कु.द्रोण केळवेकर, मंजिरी सावंत, अथर्व बने, अन्वी राऊत, तत्वमसी तांडेल, शिवाजीच्या भूमिकेत शिवांश सावंत , शिवगर्जना कु.वेदांत वझे, कु. शिवन्या साळवी, कु.सृष्टी बैकर, कु.अर्णा पोवार, कु.सत्यम तोरसकर, कु.गझल गजभारे, कु.रूद्र पाडावे यांनी शिवजन्मोत्सवासह पाळणा, माहिती, पोवाडा, शिवनाट्य सादर केले.

यावेळी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा अक्षता चव्हाण मॅडम, ज्येष्ठ शिक्षिका मुग्धा पाटील, अपर्णा पालव , किरण राणे, संजना रावराणे, प्रांजली जाधव व अन्य शिक्षकवृंद उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रमांचे सूत्रसंचालन कु.काव्या खांदारे या इयत्ता चौथीच्या विद्यार्थीनीने केले.