May 25, 2024

“पलाश प्रॉडक्शन्स” यांचे “मीराहिर” या मराठी अल्बम द्वारे संगीत क्षेत्रात पदार्पण

मुलुंड- पलाश प्रॉडक्शनच्या संचालिका प्रज्ञा पळसुले या गेली अनेक वर्षे गीतलेखन आणि कन्टेन्ट रायटिंग या क्षेत्रात कार्यरत असून अनेक वर्तमानपत्रे, मासिके व मीडिया प्रोडक्शन हाऊस साठी त्यांनी काम केले आहे. गेल्या काही महिन्यात प्रज्ञा यांनी दिग्दर्शित केलेली मधुर गाणी युट्युब व टीव्ही वर प्रदर्शित झाली असून त्यांना चांगली प्रसिद्धी मिळाली आहे.

आता प्रज्ञा पळसुले यांनी आपल्या “पलाश प्रोडक्शन्स” या नवीन प्रोडक्शन बॅनर ची स्थापना केली असून त्या अंतर्गत विविध गाणी, डॉक्युमेंटरी आणि चित्रपट निर्मिती करणार असल्याचा मानस यांनी व्यक्त केला आहे. या अंतर्गत “मीराहिर” या नव्याकोऱ्या म्युझिक अल्बम ची घोषणा केली आहे. हा अल्बम एक “फीलगुड प्रेम कहाणी” असून त्यात बहुरंगी भावना असलेली ६ गाणी असतील असे प्रज्ञा यांचे म्हणणे आहे. या अल्बम मध्ये मराठी मालिकांमधील प्रसिद्ध तारका ऋतुजा कुलकर्णी, अभिनेता शाश्वत सौरव यांनी आपली अदाकारी पेश केली आहे. या अल्बमला आकाश घरत व श्रुती यांनी आवाज दिला असून आरोह कांगो यांनी संगीतबद्ध केले आहेत.

यातील २ गाण्यांचे अनावरण व पलाश बॅनर चे उद्घाटन १० फेब्रुवारी रोजी मुलुंड, मुंबई मधील “महाराष्ट्र सेवा संघ” हॉल येथे दिमाखात पार पडले. या कार्यक्रमाला प्रथितयश संगीतकार कौशल इनामदार, ज्येष्ठ पत्रकार अनिल थत्ते व कोकण मराठी साहित्य परिषदेचे रायगड अध्यक्ष संजय गुंजाळ यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लावली.

अधिक माहिती व गाण्यांचा अल्बम पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.