MY ANDHERI NEWS

Your friendly community news portal

MY ANDHERI NEWS

MY ANDHERI NEWS

NEWS

शिवसेनेच्या ठाकरे- शिंदे गटात राडा

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra assembly election) प्रचाराच्या दरम्यान मुंबईतील जोगेश्वरी पूर्व(Jogeshwari East) येथे शिवसेनेच्या दोन गटातील कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. शिवसेना (एकनाथ शिंदे) (Shivsena Eknath Shinde)आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) (Shivsena UBT) कार्यकर्त्यांमध्ये झाल्यानंतर जोगेश्वरी-विक्रोळी लिंक (Jogeshwari Vikhroli Link road) रोडजवळ जोरदार वादावादी झाल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी (Mumbai Police)घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली.

जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघात सेना विरुद्ध सेना अशी चुरशीची लढत होत आहे. शिवसेनेने (एकनाथ शिंदे) विद्यमान आमदार आणि खासदार रवींद्र वायकर (MP Ravindra Waikar) यांच्या पत्नी मनीषा वायकर यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी नगरसेवक अनंत (बाळा) नर यांच्या विरोधात उभे केले आहे.

फ्री प्रेस जर्नलच्या वृत्तानुसार, शिवसेनेच्या ठाकरे गटाचे कार्यकर्ते शिंदे गटाच्या महिला कार्यकर्त्यांचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करत असल्याचा आरोप शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी केला. शिंदे गटाच्या महिलांनी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यापासून रोखल्यानंतर त्यांनी गैरवर्तन केले. वाद वाढला आणि दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. तथापि, मुंबई पोलिसांनी या घटनेवर भाष्य केलेले नाही आणि गोंधळाच्या कारणाची पुष्टी झालेली नाही.

समोर आलेल्या या घटनेच्या व्हिडीओमध्ये मुंबई पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचून गर्दीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून येते. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली.

महाराष्ट्रातील 288 विधानसभा मतदारसंघांसाठी बुधवार, 20 नोव्हेंबर रोजी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. शनिवार, 23 नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर होणार आहेत.