MY ANDHERI NEWS

Your friendly community news portal

MY ANDHERI NEWS

MY ANDHERI NEWS

CRIME NEWS

वाहतूक पोलिसावर गाडी चढवणाऱ्या व्यावसायिकास अंधेरीत अटक

अंधेरी – शुक्रवारी पहाटे 1 च्या सुमारास दारूच्या नशेत असलेल्या 32 वर्षीय व्यावसायिकाने आपली एसयूव्ही एमआयडीसी(MIDC) परिसरात आणि अंधेरीतील(Andheri) गोखले पुलाजवळ(Gokhale bridge) पोलिसांच्या बॅरिकेड्समध्ये घुसवली, त्यात एक हवालदार जखमी झाला आणि दोन वाहनांचे नुकसान झाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एमआयडीसी येथे पहिल्या तपासणी नाक्यावरुन पळून जात असताना आरोपीच्या वाहनाने लोखंडी बॅरिकेडस काही अंतरावर ओढत नेले. नंतर, गोखले पुलाजवळील दुसऱ्या तपासणी नाक्यावर, त्याने वाहतूक पोलीस हवालदार जयवंत मोरे, वय 37, यांच्यावर गाडी चालवण्याचा प्रयत्न केला आणि दुसऱ्या बॅरिकेडमध्ये घुसला. सुमारे 3 किमी गाडी चालवल्या नंतर स्थानिकांच्या मदतीने पोलिसांनी त्याला अटक केली.

आरोपी सब्यसाची देवप्रिया निशंक हा वरळीचा(Worli) रहिवासी आहे. एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, “एमआयडीसीमधील बॅरिकेड तोडून निशंक पळून जाण्यात यशस्वी झाला.”

सहार वाहतूक विभागाशी संलग्न असलेले कॉन्स्टेबल मोरे म्हणाले, “आम्ही वाहने तपासत होतो तेव्हा आरोपी वेगात आला. रास्ता रोकोमुळे त्यास गाडी थांबवावी लागली. जेव्हा आम्ही त्याला अल्कोहोल चाचणीसाठी खिडकी खाली करण्यास सांगितले तेव्हा त्याने नकार दिला. आम्ही त्याला गाडी बाजूला घेण्याची सूचना केली, पण त्याने माझ्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला. मला दुसऱ्या बाजूला उडी मारून स्वत:ला वाचवावे लागले.” मोरे पुढे म्हणाले, “पळून जाताना लोखंडी बॅरिकेड कारच्या बोनेटमध्ये अडकले आणि निशंकने ते एमआयडीसी (MIDC) कडे ओढले.”

निशंक एमआयडीसीमधील एका अरुंद गल्लीत पोहोचल्यावर त्याला एका कोपऱ्यात घेराव करण्यात आला. स्थानिकांनी त्याच्या कारच्या खिडक्या तोडून मारहाण केली. त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. “त्याच्यासोबत एक महिला होती आणि ती देखील दारूच्या नशेत असल्याचे आढळून आले. निशंकला अटक करण्यात आली आणि सोबतच्या महिलेला समज देऊन सोडण्यात आले,” एका अधिकाऱ्याने सांगितले.

अंधेरी पोलिस स्टेशनचे(Andheri Police Station) उपनिरीक्षक अजय तोडकर म्हणाले, “आम्ही निशंकला अटक केली असून रक्ताचा नमुना तपासणीसाठी पाठवला आहे. आम्ही अहवालाची वाट पाहत आहोत,” असे एमएसएन डॉट कॉम च्या वृत्तांत म्हटले आहे.