MY ANDHERI NEWS

Your friendly community news portal

MY ANDHERI NEWS

MY ANDHERI NEWS

NEWS Social

मानवाधिकार दिनानिमित्त घर कामगार महिलांचा मेळावा

मुंबई, दि.१२ ( प्रतिनिधी ) दहा डिसेंबर या जागतिक मानवाधिकार दिनानिमित्त(International Human Rights Day) साऊ संगिती असंघटित कामगार युनियनच्या वतीने दहा डिसेंबर रोजी डोंबिवली() इथे घर कामगार (Domestic workers)महिलांचा एक भव्य मेळावा आयोजित करण्यात आला होता. युनियनचे अध्यक्ष राजू शिरधनकर यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या या मेळाव्यात परिसरातील शेकडो महिला आवर्जून उपस्थित होत्या.

या मेळाव्यात घर कामगार महिलांचे घटनात्मक अधिकार,स्वसन्मान,कायदेशीर लढाई,घरेलु कामगार चळवळीचा इतिहास आणि वर्तमान स्थिती या विषयावर जाणकारांनी मार्गदर्शन केले.त्यासाठी ज्येष्ठ पत्रकार आणि कार्यकर्ते रवि भिलाणे, कामगार नेते कॉम्रेड काळू कोमासाकर, ॲड.सुधा भारद्वाज, ज्येष्ठ लेखिका आणि कवयित्री छायाताई कोरेगावकर आणि घरेलु कामगार समन्वय समितीचे विजय खरात आदी मान्यवर उपस्थित होते. युनियनचे कॉम्रेड शरद निकम यांनी कार्यक्रमाचे सूत्र संचालन केले.

घरेलु कामगारांच्या मागण्यांसाठी तीव्र संघर्ष करण्याचा निर्धार करूनच मोठ्या उत्साहाने उपस्थित महिला घरी परतल्या.

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *