अंधेरी – शिवसेना शिंदे गटाचे अंधेरी विभागाचे विभाग प्रमुख विजय सर्जेराव दिवार यांचे मंगळवार, 19 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5.30 वाजता अल्पशा आजाराने मरोळ मधील सेव्हन हिल्स इस्पितळात निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय 59 वर्षे होते. त्यांच्या पश्चात पत्नी आणि 2 कन्या असा परिवार आहे.
विजय धिवार हे कट्टर शिवसैनिक म्हणून अंधेरी विभागात परिचित होते. राज ठाकरे यांनी मनसेची स्थापना केल्यानंतर धिवार यांनी मनसेत प्रवेश केला होता. उपविभागप्रमुख म्हणून ते कार्यरत होते. एकनाथ शिंदे यांंच्या शिवसेनेत ते अंधेरी विभागाचे विभाग प्रमुख बनले.
विजय धिवार यांच्या अकाली निधनाने अंधेरीतील राजकीय वर्तुळात हळहळ व्यक्त केली जात आहे.