मुंबई- बुधवारी महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका (Maharashtra Assembly Election) पार पडल्या. निवडणुका संपल्यानंतर एक्झिट पोल एजन्सीने आपापले अंदाज व्यक्त केले. या अंदाजानुसार महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडी (MahaVikas Aghadi) यांच्यात काट्याची टक्कर दिसून येते.
इलेक्टोरल एज, पोल डायरी, चाणक्य, न्यूज 24 पी मार्क, दी मॅट्रीज, दी पीपल्स पल्स, पोल ऑफ पोल्स, टाइम्स नाऊ जेव्हीसी, टीव्ही 9 रिपोर्टर, माक्सीमालिस्ट, लोकशाही मराठी रुद्र, एसएएस हैदराबाद, दैनिक भास्कर आदी संस्थेने आपले अंदाज व्यक्त केले आहेत.
इलेक्टोरल एज, एसएएस हैदराबाद, दैनिक भास्कर यांच्या अंदाजानुसार महाविकास आघाडीला स्पष्ट बहुमत मिळेल. तर दी पीपल्स पल्स, पोल ऑफ पोल्स, टाइम्स नाऊ जेव्हीसी, माक्सीमालिस्ट यांच्या अंदाजानुसार महायुतीला मतदारांचा कौल असेल.
मात्र मागील काही निवडणुकीमध्ये मतदारांचा कल तपासणाऱ्या संस्थेचे अंदाज चुकीचे ठरलेले दिसून आले आहे. या पार्श्वभूमीवर यावेळी कोणत्या संस्थेचा पाहणी अहवाल खरा ठरेल हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.