WhatsApp Image 2026 04 12 At 22.59.28

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आजवर देश व समाजासाठी केलेल्या महान कार्याला नमन करत त्यांना कृतज्ञतापूर्वक धन्यवाद व्यक्त करण्याच्या भावनेतून प्रेरित ‘धन्यवाद भिमाचं करूया’ हे प्रेरणादायी मराठी भिमगीत दिनांक ११ एप्रिल रोजी Nirmiti Productions (@NirmitiProductions) या YouTube चॅनलवर प्रदर्शित करण्यात आले असून श्रोत्यांकडून गाण्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना अभिवादन करत समाजात शिक्षण, समानता आणि मानवतेची जाणीव निर्माण करण्याचा संदेश या गीतातून देण्यात आला आहे. “ना जातीत ना धर्मात, शिक्षणात त्यांना शोधूया” ही ओळ गीताचा मुख्य विचार अधोरेखित करते आणि समाजजागृतीचा प्रभावी संदेश पोहोचवते.

या गीताचे शब्दलेखन विक्रांत केदारे यांनी केले असून भावपूर्ण गायन व संगीत दिग्दर्शन संदीप कांबळे यांनी केले आहे. गीताला आधुनिकतेची जोड देत प्रभावी संगीत संयोजन अजय म्हात्रे यांनी केले असून उत्कृष्ट ध्वनीमिश्रण व मास्टरिंग प्रथमेश मोहिते यांनी साकारले आहे.

WhatsApp Image 2026 04 12 At 22.59.50

विशेष म्हणजे हे गाणे अलिबागच्या समुद्रकिनारी निसर्गरम्य वातावरणात चित्रित करण्यात आले आहे. समुद्रकिनाऱ्यावरील शांत, प्रेरणादायी दृश्यांमुळे गीताची भावनिक ताकद अधिक प्रभावीपणे प्रेक्षकांपर्यंत पोहोचते.

भिमजयंतीच्या पार्श्वभूमीवर प्रदर्शित झालेले हे गीत केवळ संगीतकृती नसून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महान कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा सामाजिक संदेश ठरत आहे. सोशल मीडियावर भिम अनुयायी आणि तरुण वर्गाकडून या गीताला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद द्यावा ही अपेक्षा सर्व कलाकारांनी व्यक्त केली आहे.

गीत: विक्रांत केदारे
गायक व संगीत: संदीप कांबळे
संगीत संयोजक: अजय म्हात्रे
मिक्स व मास्टर: प्रथमेश मोहिते
प्रदर्शन: ११ एप्रिल | Nirmiti Productions (YouTube)