हर्षवर्धन राणे दिसणार निवृत्त पोलीस अधिकारी दया नायकच्या भूमिकेत
D Company पेक्षा जास्त खतरनाक..
1997 ते 2004 दरम्यान 319 गुंड मारले गेले…
#POLICECOMPANY — 4 जून 2027 रोजी सिनेमागृहात
या ओळी रामगोपाल वर्माच्या आगामी ‘पोलीस कंपनी’ चित्रपटाविषयी जबरदस्त उत्सुकता निर्माण करतात. या चित्रपटाचे पोस्टर नुकतेच प्रदर्शित करण्यात आले आहे.

‘पोलीस कंपनी’ हा चित्रपट निवृत्त पोलीस अधिकारी दया नायक यांच्या जीवनावर आधारित असल्याचे म्हटले जाते. हर्षवर्धन राणे हा चित्रपटात नायकाची भूमिका साकारणार असून फरदीन खान, सौरभ शुक्ल, परेश रावल, फातिमा सना शेख, मकरंद देशपांडे, अश्विनी काळसेकर देखील चित्रपटात दिसणार आहेत.
पुढील वर्षी म्हणजेच 4 जून 2027 रोजी हा सिनेमा चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.
या चित्रपटाची निर्मिती टी सिरीज करणार आहे.

