पालघर : विरार येथील विवा महाविद्यालयाला २०२४ या वर्षांकरिता “सेंटर ऑफ एक्सलन्स”, राज्यस्तरीय ५ व्या क्रमांकाचे “उत्कृष्ट महाविद्यालय” या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग व महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने करिअर कट्टा राज्यस्तरीय स्पर्धा पुरस्कार वितरण सोहळा २०२५ नुकताच यशवंराव चव्हाण सेंटर मुंबई येथे झाला.
राज्यातील ५० महाविद्यालयांचा यामध्ये समावेश आहे. यावर्षी महाविद्यालयाने करिअर कट्टा उपक्रमाद्वारे विविध उपक्रम व योजना राबवित पालघर जिल्हात प्रथम येत ए+ ग्रेड सोबतच सेंटर ऑफ एक्सलन्स पुरस्कार प्राप्त केला. हा पुरस्कार महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री मा. उदयजी सामंत यांच्या हस्ते मिळाला. सलग दोन वर्षे सेंटर ऑफ एक्सलन्स पुरस्कार प्राप्त करणारे हे पालघर जिल्हातील पहिलेच महाविद्यालय ठरले आहे. या कार्यक्रमात विवा महाविद्यालयाचे करिअर कट्टा सह समन्वयक डॉ. रोहन गवाणकर यांना राज्यस्तरीय उत्कृष्ट महाविद्यालय समन्वयक ( ५ व्या क्रमांक) या सन्मानाने गौरविण्यात आले.
पॉवर ऑफ सेक्टर स्किल कॉन्सिलचे सचिव प्रफुल पाटक, प्रीआय. ए. एस. ट्रेंनींग सेंटर मुंबईच्या संचालिका भावना पाटोळे, महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे संचालक विनोद मोहितकर, मुंबई वाहतूक शाखेचे उपआयुक्त मितेश घट्टे, खादी ग्रामीणचे संचालक बिपीन जगताप व करिअर कट्टाचे अध्यक्ष यशवंत शितोळे यांच्या हस्ते महाविद्यालयाच्या उप प्राचार्या व करिअर कट्टा विभागीय समन्वयक ( मुंबई विभाग) डॉ. दीपा वर्मा, एनसीसी प्रमुख वैभव सातवी यांनी हा सन्मान स्वीकारला.