मुंबई- अल्ट्रा मराठी या संगीत वाहिनीने महाराष्ट्र दिनाला समर्पित ‘अभिमान महाराष्ट्राचा’ या गीताचे नुकतेच अनावरण केले. या गाण्याचे गायक, संगीतकार आणि गीतकार अनिमेश ठाकूर आणि साक्षी चौहान आहेत. आधुनिक संगीताचा मेळ साधत हे गीत श्रवणीय झाले आहे.
उज्वला सावंत, संतोषी सळमवाडे, हर्षाली सावंत, अपर्णा कांबळे, रुपेश शिर्के, निखिल शिंदे या कलाकारांवर हे गाणे चित्रित करण्यात आले आहे. सचिन उतेकर, परेश मोरे, केतन चव्हाण या वादकांनी वादनाची जबाबदारी उत्तम पार पाडली आहे. गाण्याचे दिग्दर्शन रुपेश जाधव याचे आहे तर छायादिग्दर्शन करण जेठवा आणि जगदीश दबडे याचे आहे. संकलन निलेश शेलार याने केले असून रंगभूषा अशोक पुरबिया यांची आहे. हे गाणे अनाक्षी स्टुडिओज येथे ध्वनीमुद्रित करण्यात आले आहे.
सदर गाणे खालील विविध माध्यमांवर ऐकता येईल.
SAAVN – https://www.jiosaavn.com/song/abhiman…
GAANA – https://gaana.com/song/abhiman-mahara…
AMAZON – https://music.amazon.in/tracks/B0GY19…
SPOTIFY – https://open.spotify.com/track/6Zmlfw…
I TUNE – / abhiman-maharashtracha
YT MUSIC – • Abhiman Maharashtracha
