Viva Art

विरार : विवा इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाइड आर्ट महाविद्यालया मध्ये दिनांक १० फेब्रुवारी २०२६ रोजी वार्षिक कला प्रदर्शनचा उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. संगीता संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून श्री. निलेश जाधव, व्हिज्युअल आर्टिस्ट व इलस्टेटर उपस्थित होते. त्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले.

महाविद्यालयाच्या निसर्गरम्य प्रांगणाचे कौतुक करत हि वास्तू कलेसाठी आणि कलाकारांसाठी पोषक आहे असे म्हणाले. तसेच, सध्याच्या AI च्या युगात विद्यार्थ्यांनी कृत्रिम प्रज्ञे सोबतच स्वतःच्या कलेला प्राधान्य देणे आवश्यक आहे. संगणकावर कितीही डिजिटल काम केले तरी कागद, रंग, ब्रश यांसोबत तुमच्यातील कलाकार जिवंत राहतो आणि कलाकृतीही अजरामर होते, अशा शब्दांत जाधव यांनी मार्गदर्शन केले.

WhatsApp Image 2026 02 16 At 07.16.26 1024x682

कार्यक्रमावेळी व्यासपीठावर विष्णू वामन ठाकूर ट्रस्टचे खजिनदार शिखर हितेंद्र ठाकूर, संजीव पाटील, आणि संस्थेचे इतर पदाधिकारी हजर होते. यावेळी शिखर ठाकूर यांनी त्यांच्या आकर्षक शैलीत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. महाविद्यालयातील शिक्षकवर्ग, विद्यार्थी व पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी साकारलेल्या विविध कलाकृती पेंटिंग, स्केचेस, ग्राफिक डिझाईन, पोस्टर्स, हस्तकला व इतर सर्जनशील कलाप्रकार सादर करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचे व मेहनतीचे उपस्थित मान्यवरांनी विशेष कौतुक केले.

कार्यक्रमाप्रसंगी वसईच्या मातीतील सुप्रसिद्ध मूर्तिकार, स्वर्गीय दुष्यंत रघुनाथ हाटकट यांचा मरणोपरांत सन्मान करण्यात आला. त्यांच्या कन्या श्रीमती सुजाता हाटकर यांनी हे सन्मानपत्र स्वीकारले. स्वर्गीय दुष्यंत रघुनाथ हाटकट यांच्या योगदानाबद्दल महाविद्यालयाच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले. प्राचार्या डॉ. संगीता संजय पाटील यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांना कला क्षेत्रात सातत्याने मेहनत करण्याचा संदेश दिला.

विष्णू वामन ठाकूर चॅरिटेबल ट्रस्ट चे विवा इन्स्टिटयूट ऑफ अप्लाइड आर्ट ह्या विरार पूर्व, शिरगाव येथील कला महाविद्यालयात २०१० साली बी एफ ए ह्या प्रोग्रॅम मध्ये अप्लाइड आर्ट व पेंटिंग हे दोन पदवी अभ्यासक्रम सुरु करण्यात आले आहेत. समारंभाच्या सुरुवातीस प्राचार्य डॉ संगीत पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या वार्षिक कामगिरीची दाखल घेऊन संस्थेच्या वर्षभराचा कामाचा आढावा घेत पाहुण्यांचे स्वागत केले. या नंतर संस्थेने सामाजिक बांधिलकी चे भान ठेवत, ७ वर्ष पूर्वी सुरु केलेल्या अत्यंत्य स्त्युत्य अश्या ‘सन्मानपत्र’ बहाल करण्याच्या अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना प्रसिध्दी आणि दिग्गज स्थानिक कलाकारांची माहिती होते तसेच या कलाकरांच्या जीवन्प्रवासातून प्रेरणा मिळते, असे नमूद केले.

सदर कला प्रदर्शन विवा इन्स्टिटयूट ऑफ अप्लाइड आर्टला विष्णू वामन ठाकूर चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर, संस्थेच्या सेक्रेटरी अपर्णा ठाकूर, व्यवस्थापन समितीचे सदस्य संजीव पाटील, संजय पिंगुळकर, एस.एन पाध्ये, विवा महाविद्यालयाचे समन्वयक नारायण कुट्टी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.