अंधेरी- हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शाखा क्रमांक ८६ चे उपशाखाप्रमुख धर्मेश राठोड यांनी वेगळ्या पद्धतीने कार्यक्रमाचे आयोजन केले होते. शालेय विद्यार्थ्यांना व लहान मुलांना पेन आणि खाऊ वाटपाचा कार्यक्रम राठोड यांनी आयोजित केला होता. या कार्यक्रमास विद्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद मिळाला.

छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेल्या शौर्य, स्वाभिमान आणि समाजसेवेच्या प्रेरणेने हा उपक्रम राबविण्यात आला. भविष्यातील पिढी घडविणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याचा हा छोटासा प्रयत्न असल्याची भावना यावेळी आयोजक धर्मेश राठोड यांनी व्यक्त केली.

या कार्यक्रमास माजी नगरसेवक क्लाईव्ह डायस, शाखाप्रमुख बिपीन शिंदे, महिला शाखा संघटिका सरिता रेवाळे, युवाशाखा अधिकारी किरण पुजारी तसेच सर्व महिला-पुरुष पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.









