विरार : विरार येथील विवा महाविद्यालयाच्या(Viva College) विद्यार्थिनीने मुंबई विद्यापीठाच्या (University of Mumbai) अंतिम परीक्षा निकालात घवघवीत यश संपादन करत सुवर्णपदक पटकावले आहे. या उल्लेखनीय यशामुळे महाविद्यालयाच्या शैक्षणिक परंपरेला नवी उंची प्राप्त झाली आहे. मुंबई विद्यापीठाच्या सन शैक्षणिक वर्ष २०२३-२५ च्या परीक्षांमध्ये जसिका जगदीश जान्हवी उमरसकर या विद्यार्थिनीने एमएससी (पर्यावरणशास्त्र) या अभ्यासक्रमात प्रथम क्रमांक मिळवत सुवर्णपदकाचा मान मिळविला.

हा दीक्षांत समारंभ सर कावसजी जहांगीर सभागृहात वैज्ञानिक सल्लागार अजय कुमार सुद यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमाला प्र कुलगुरू प्राचार्य डॉ.अजय भामरे, कुलसचिव डॉ. प्रसाद कारंडे उपस्थित होते. सातत्यपूर्ण अभ्यास, शिस्तबद्ध मेहनत आणि प्राध्यापकांचे योग्य मार्गदर्शन यामुळे हे यश साध्य झाले असल्याचे विद्यार्थिनी जसिकाने सांगितले.

या यशाबद्दल विवा महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या डॉ. दीपा वर्मा यांनी विद्यार्थ्याचे अभिनंदन करत, “विवा महाविद्यालय विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर देते. हे सुवर्णपदक म्हणजे आमच्या शैक्षणिक गुणवत्तेचा पुरावा आहे,” असे मत व्यक्त केले. तसेच संबंधित विभागप्रमुख व प्राध्यापकांनीही विद्यार्थ्याच्या यशाबद्दल समाधान व्यक्त केले.

विष्णू वामन ठाकूर चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष माननीय श्री. हितेंद्रजी ठाकूर, संस्थेच्या सेक्रेटरी अपर्णा ठाकूर, संस्थेचे खजिनदार शिखर हितेंद्रजी ठाकूर, व्यवस्थापन समितीचे सदस्य संजीव पाटील, संजय पिंगुळकर, एस.एन पाध्ये, विवा महाविद्यालयाचे समन्वयक नारायण कुट्टी, महाविद्यालयाच्या उप प्राचार्या डॉ. प्राजक्ता परांजपे, एमएससी (पर्यावरणशस्त्र विभाग) समन्वयक डॉ. वैभव सातवी, शिक्षकवृंद व विद्यार्थ्यांनी सुवर्णपदक विजेती जसिकाचे अभिनंदन केले असून, भविष्यातही विवा महाविद्यालयातून असेच गुणवंत विद्यार्थी घडतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.