अंधेरी: अंधेरी पश्चिमेतील(Andheri West) एका धक्कादायक घटनेत, एका २९ वर्षीय पुरूषाने एका महिलेवर गाडी चालवून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. याप्रकरणी ओशिवरा पोलिस ठाण्यात(Oshiwara Police Station) आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नवराष्ट्र.कॉमने शेअर केलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये रात्री ९.३० वाजताच्या सुमारास लोखंडवाला येथील अरेना बिल्डिंगच्या प्रवेशद्वारावर ही घडलेली घटना आहे. व्हिडिओमध्ये कार आवारात प्रवेश करताना आणि अचानक महिलेला धडक देण्याचा प्रयत्न करताना वेगाने येत असल्याचे दिसून आले आहे. फुटेजमध्ये दिसत आहे की, महिला रागाच्या भरात कारच्या मागे धावली, तर काही जवळच्या लोकांनी हस्तक्षेप करून आरोपीला थांबवण्याचा प्रयत्न केला. त्या पुरूषाने दुसऱ्यांदा महिलेवर गाडी धडकवण्याचा प्रयत्न केला. तथापि, काही रहिवाशांनी इमारतीचे गेट बंद केले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला.

गेल्या ९ महिन्यांपासून, मोहम्मद शेख म्हणून ओळखला जाणारा आरोपी त्याच्या मित्रांमध्ये आणि कुटुंबात संबंधित मॉडेल विषयी अफवा पसरवत होता. यामुळे दोघांमध्ये अनेक वाद झाले. पोलिसांनी नवराष्ट्र डॉट कॉमला दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वीच, मॉडेल आणि तिचा मित्र आरोपीच्या घरी गेले होते. त्याने पसरवलेल्या अफवांबद्दल त्याला विचारले होते, परंतु त्याने दार उघडले नाही. तो बाहेर न पडल्याने दोन्ही मुली त्याच्या नावाने मोठ्याने हाका मारत होत्या.

पोलीस अहवालात असेही म्हटले आहे की दुसऱ्याच दिवशी, मॉडेलच्या मैत्रिणीला तिच्या स्नॅपचॅटवर अ‍ॅसिड हल्ल्याचा धमकीचा संदेश आला. धमकीच्या संदेशानंतर, आरोपीने मॉडेलला तिच्यावर गाडी चालवून ठार मारण्याचा प्रयत्न केला, असे फ्री प्रेस जर्नलचे वृत्त आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *