नवी मुंबई- ऐरोलीतील भाजपचे युवा पदाधिकारी अॅड. निकेतन नरेश पाटील यांची भारतीय जनता युवा मोर्चाच्या नवी मुंबई जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे. नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष डॉ. राजेश पाटील यांनी लेखी निवेदनाद्वारे या पदाची घोषणा केली आहे. कट्टर भाजप समर्थक असलेले निकेतन पाटील हे मागील १५ वर्षांपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भारतीय जनता पक्ष यामध्ये सक्रिय आहेत.
गेल्या १५ वर्षांत केलेल्या कार्याची पक्षाने दखल घेऊन आज जबाबदारी दिलेली आहे. या पदाचा योग्य वापर करून तरुणांना रोजगार मिळवून देणे, शिक्षण आणि उद्योग व्यवसायात वाढीसाठी प्रयत्न करणे याकरिता कटिबद्ध राहीन, अशी ग्वाही नवनिर्वाचित भाजयुमो नवी मुंबई युवा अध्यक्ष अॅड. निकेतन नरेश पाटील यांनी दिली.
निकेतन पाटील यांना भाजपाने महत्वाच्या पदावर नियुक्त केल्याने विविध स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.





