MY ANDHERI NEWS

Your friendly community news portal

MY ANDHERI NEWS

MY ANDHERI NEWS

NEWS

अंधेरीमध्ये ऑटो रिक्षावर झाड कोसळले

अंधेरी- शुक्रवारी दुपारी अंधेरी(Andheri) पूर्वेतील भवानी नगर येथे मुसळधार पावसामुळे ५० वर्षांहून अधिक जुने झाड कोसळले. लोटस सोसायटीजवळ हे झाड उभ्या केलेल्या रिक्षावर(Autorikshaw) कोसळले. रिक्षाचे मोठे नुकसान झाले आहे.

शुक्रवारी अंधेरी परिसरात पावसाची संततधार सुरू असताना ही घटना घडली. प्रत्यक्षदर्शींच्या मते, पडलेल्या झाडाच्या वजनाखाली ऑटो रिक्षा पूर्णपणे दबली गेली.

मिड डेच्या वृत्तानुसार ही घटना पाहणारे शिवसेनेचे Shivsena UBT (उबाठा) महाराष्ट्र वाहतूक सेनेचे राज्य सचिव इंतेखाब फारुकी यांनी तातडीने अग्निशमन दलाला माहिती दिली. आपत्कालीन मदत करणारे कर्मचारी वेळेवर घटनास्थळी पोहोचले आणि वाहतूक सुरळीत करण्यासाठी रस्ता मोकळा केला.

“रिक्षाचालकाला किरकोळ दुखापत झाली आणि त्याच्यावर जवळच उपचार करण्यात आले. सुदैवाने, इतर कोणालाही दुखापत झाली नाही,” असे फारुकी म्हणाले.