WhatsApp Image 2025 08 29 At 13.54.56

विरार : विवा महाविद्यालयात आंतर महाविद्यालयीन २०वे आविष्कार संशोधन अधिवेशन २०२५-२६ , झोन ६, जिल्हा पालघर व विद्यार्थी विकास विभाग, मुंबई विद्यापीठ यांच्या सहकार्याने एकदिवसीय संशोधन अधिवेशन आयोजन करण्यात आले होते. पालघर जिल्ह्यातील विविध महाविद्यालयीन संस्था वाणिज्य, कला व विज्ञान शाखेतील एकूण १५० विद्यार्थ्यांचा प्रत्यक्ष सहभाग असून १५ महाविद्यालयातील प्राध्यापक – विद्यार्थी वर्गाने या अधिवेशनाचा उत्स्फूर्तपणे लाभ घेतला.

हे अधिवेशन मुंबई विद्यापीठाचे विद्यार्थी कल्याण विकास विभाग डायरेक्टर डॉ. सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. मीनाक्षी गुरव ( ओएसडी, आविष्कार संशोधन अधिवेशन, मुंबई विद्यापीठ), डॉ. ससी कुमार मेनॉन ( प्रवक्ते, आविष्कार संशोधन अधिवेशन पालघर जिल्हा ), डॉ.सुनीता शैलजन ( प्रवक्ते, आविष्कार संशोधन अधिवेशन पालघर जिल्हा ), डॉ. मनिष देशमुख ( सह समन्वयक, आविष्कार संशोधन अधिवेशन पालघर जिल्हा ), विवा महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या तसेच आविष्कार संशोधन अधिवेशन पालघर जिल्ह्याचे सह समन्वयक डॉ. दीपा वर्मा, उपप्राचार्या डॉ. प्राजक्ता परांजपे आदी मान्यवर उपस्थित होते. या अधिवेशनाचे आभारप्रदर्शन आविष्कार संशोधन अधिवेशनाचे स्थानिक समन्वयक डॉ. रोहन गवाणकर यांनी केले. अधिवेशनाचे यशस्वी नियोजन डॉ. अनुश्री किनी, विनोद डीडवाना, विकास गुप्ता, देवेश मच्ची, आलोक तिवारी, ओमकारी पोतदार प्राध्यापक वृंदानी केले.

विद्यार्थी जीवन जगत असताना विद्यापीठ व राज्य पातळीवर विद्यार्थ्यांमध्ये संशोधनाची आवड निर्माण व्हावी याकरिता आविष्कार तसेच विविध प्रकारच्या स्पर्धेचे आयोजन मुंबई विद्यापीठाद्वारे केले जाते. दिवसेंदिवस नवीन संशोधन निर्माण होऊन राष्ट्र निर्मितीचे कार्य व्हावे याकरिता राज्य व केंद्र सरकारकडून देखील मोठ्या प्रमाणात संशोधनासाठी प्रोत्साहन दिले जाते.

या अधिवेशनात प्रवेशिका सहा श्रेणींमध्ये विभागल्या गेल्या. मानवता, भाषा आणि ललित कला, वाणिज्य, व्यवस्थापन आणि कायदा, शुद्ध विज्ञान, कृषी आणि पशुसंवर्धन, अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान आणि फार्मसी या क्षेत्रात असणाऱ्या संशोधनाच्या संधी बद्दल मार्गदर्शन करण्यात आले. उपस्थितांना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. हे आधिवेशन यशस्वी होण्यासाठी विद्यार्थी – प्राध्यापक वर्गाने विशेष मेहनत घेतली.

या विभागीय संशोधन अधिवेशनाला मुंबई विद्यापीठातील विद्यार्थी विकास विभागाचे डायरेक्टर डॉ. सुनील पाटील, विष्णू वामन ठाकूर चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष माननीय श्री. हितेंद्रजी ठाकूर, संस्थेच्या सेक्रेटरी अपर्णा ठाकूर, व्यवस्थापन समितीचे सदस्य संजीव पाटील, संजय पिंगुळकर, एस.एन पाध्ये, विवा महाविद्यालयाचे समन्वयक नारायण कुट्टी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.