सागबागमध्ये उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस लोकोपयोगी उपक्रम राबवून शिवसैनिकांनी केला साजरा
अंधेरी- रविवारी शिवसेना उबाठा पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस शिवसैनिकांनी उत्साहात साजरा केला. वाढदिवसानिमित्त राज्यभर विविध लोकोपयोगी उपक्रम राबवले गेले. अंधेरीतील शाखा क्रमांक.८६ आणि भैरवनाथ जनसेवा संस्थेतेने देखील मरोळ सागबाग येथे विविध सामाजिक उपक्रम राबवत उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस साजरा केला.
संस्थेचे अध्यक्ष व उपशाखाप्रमुख राजू गणपत सूर्यवंशी यांच्या वतीने रक्तदान शिबिर ,मोफत आरोग्य शिबिर, नेत्र तपासणी शिबिर व ज्येष्ठ नागरिकांसाठी आधारकाठी वाटप आदी कार्यक्रम आयोजित करण्यात आले. वेदांत सेंट्रल हॉस्पिटल, ईशा नेत्रालय आणि हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे रक्तपेढी पेढी यांचे विशेष सहकार्य कार्यक्रमास लाभले.
यावेळी शिवसेना उपनेते अमोल कीर्तिकर, गुरुनाथ खोत , माजी आमदार ऋतुजा लटके, अंधेरी पूर्व विधानसभा संघटक प्रमोद सावंत, संजय पावले, मनोहर पांचाळ, बिपिन शिंदे, राम साळवी, रेशमा विश्वकर्मा, सरिता रेवाळे, अक्षदा सावंत, सारिका जाधव, शुभम सूर्यवंशी, आलम सलमानी, सहदेव पाताडे, संदेश मोरे, किरण पुजारी, सनी तेवरे, सतीश शेडगे, अमोल हांडे ,देवेंद्र भोसले, लक्ष्मण घाग, यशवंत कुंभार आदी पदाधिकारी यांच्यासह शेकडो शिवसैनिक उपस्थित होते.
या कार्यक्रमास विभागातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.





















