अंधेरी- प्रसिद्ध उद्योजक आनंद महिंद्र(Anand Mahindra) यांनी अंधेरी पश्चिम(Andheri West) येथील प्राचीन ज्वालामुखीचा डोंगर म्हणून प्रसिद्ध असलेल्या गिल्बर्ट हिल(Gilbert Hill) संदर्भात एक विडियो एक्स वर पोस्ट केला आहे. या पोस्ट मुळे गिल्बर्ट हिल पुन्हा चर्चेत आला आहे.

महिंद्रा यांनी अलीकडेच एक्सला गिल्बर्ट हिल शोधल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले आणि लिहिले: “आपल्या प्रवासाच्या बकेट लिस्ट मध्ये असावं असं एक ठिकाण आपल्या भवतालच्या परिसरात आहे. एका छोट्या तपासणीतून असे दिसून आले की गिल्बर्ट हिल जगातील फक्त 3 ज्वालामुखी स्तंभांपैकी एक आहे, तरीही मला ते मुंबईत आहे याची काहीच कल्पना नव्हती. आपण हे अधिक भेट देणारे ठिकाण कसे बनवू शकतो?” असा प्रश्न देखील एक्स या समाज माध्यमावर (X Post) विचारला आहे.