Anganwadi Sevika

अंधेरी- जागतिक महिला दिनानिमित्त शिवसेना शाखा क्रमांक 79 च्या वतीने प्रभागातील अंगणवाडी सेविका,आरोग्य सेविका व सेवाधारी स्त्रियांचा सन्मान करण्यात येणार आहे. हा सन्मान सोहळा मंगळवार, 10 मार्च रोजी सायंकाळी 7 वाजता पूर्व मोगरा गणपती मैदान, सभा मंडप, पंपहाऊस या ठिकाणी होणार आहे.

या कार्यक्रमास शिवसेना उपनेते व युवा सेना सरचिटणीस अमोल कीर्तीकर, जोगेश्वरीचे आमदार अनंत (बाळा) नर, महिला विभाग संघटिका शालिनी सावंत, माजी आमदार ऋतुजा लटके, जोगेश्वरी विधानसभा प्रमुख विश्वनाथ सावंत, नगरसेविका शिवानी परब, लोणा रावत, विद्या आर्या, नगरसेवक कैलास नाथ पाठक आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

सदर प्रसंगी सर्व महिला पुरुष युवा सेना, युवती सेना अंगीकृत संघटना पदाधिकारी यांनी सहभागी व्हावे असे आवाहन आयोजिका व प्रभाग क्र. ७९ च्या नगरसेविका मानसी मधुकर जुवाटकर यांनी केले आहे.