अंधेरी: अंधेरी पूर्व (Andheri East) येथील आघाडी नगर कॉलनी(Aghadi Nagar Colony) मध्ये एका दुकानात गुरुवारी सकाळी आग लागली. त्यात दुकान आणि उभे केलेली वाहने जळून खाक झाली. अग्निशमन दलाने एका तासात आग आटोक्यात आणली. सुदैवाने कोणतेही जीवितहानीचे वृत्त नाही.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या म्हणण्यानुसार, सकाळी ११.३७ वाजता अंबिका टॉवर्स, आघाडी नगर कॉलनी, पंप हाऊस, जिजामाता मार्ग समोर असलेल्या दुकानात आग लागली. या घटनेत दुकानाजवळ पार्क केलेल्या वाहनांचेही नुकसान झाले.

मुंबई अग्निशमन दलाचे(Mumbai Fire Brigade) अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि दुपारी १२.१६ वाजेपर्यंत आग विझवण्यात यशस्वी झाले. अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची पुष्टी केली. “तपासानंतर आगीचे नेमके कारण कळेल,” असे एका अधिकाऱ्याने सांगितले असल्याचे फ्री प्रेस जर्नलच्या वृत्तात म्हटले आहे.