मुंबई: रविवारी पहाटे जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडवर (Jogeshwari Vikhroli Link Road) एका भरधाव कारने एनएसजी कमांडोच्या मोटारसायकलला धडक दिल्याने एनएसजी कमांडो(NSG Commando) गंभीर जखमी झाला. जखमी कमांडोचे नाव विशाल शिवथरे (३१) असे आहे. तो एनएसजीच्या स्पेशल कंपोझिट ग्रुपमध्ये रेंजर आहे. तो अंधेरी (पूर्व)(Andheri East) येथील २६ एनएसजी कॅम्पमध्ये तैनात होता.

एफआयआरनुसार, शिवथरे पहाटे ३.२५ वाजता जोगेश्वरी येथे एका गोपनीय कामासाठी त्याच्या बुलेट मोटरसायकलवरून कॅम्पमधून निघाला. सकाळी ५.१४ वाजता परत येत असताना, त्याने वेग कमी केला आणि कॅम्पच्या उन्नीकृष्णन गेटसाठी उजवीकडे वळण्याचा इशारा केला तेव्हा पवईहून आलेल्या एका पांढऱ्या स्विफ्ट डिझायर कारने त्याच्या दुचाकीला वेगाने धडक दिली.

धडकेमुळे विशाल मोटारसायकलवरून गेटकडे फेकला गेला आणि त्याचे हेल्मेट उडाले. गेटवरील एनएसजी कर्मचाऱ्यांनी मदतीसाठी धाव घेतली. कॅम्पच्या एमआय रूममध्ये प्रथमोपचार केले आणि नंतर त्याला मुलुंड (पश्चिम) येथील एपेक्स हॉस्पिटलमध्ये हलवले. विशालच्या डाव्या घोट्याला, टाचेला, दुसऱ्या आणि तिसऱ्या पायाच्या बोटांना फ्रॅक्चर झाले आहे. मालवणी येथील मोहम्मद बिलाल मोहम्मद हसन अन्सारी या चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे, असे फ्री प्रेस जर्नलच्या वृत्तात म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *