विरार: युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन (UGC), शिक्षा मंत्रालय भारत सरकार, युजीसी एमएमटीटीसी मालवीया मिशन टीचर ट्रेनिंग सेंटर , श्री गुरु तेज बहादुर खालसा कॉलेज ऑफ दिल्ली युनिव्हर्सिटी(Delhi University) आणि विरार येथील विष्णू वामन ठाकूर ट्रस्ट चे विवा महाविद्यालय(Viva College) यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षकांच्या व्यावसायिक कौशल्यवृद्धीसाठी दिनांक २७ जानेवारी ते ३ फेब्रुवारी २०२६ दरम्यान मार्गदर्शक कार्यशाळेचे यशस्वी आयोजन करण्यात आले.

या कार्यशाळेला प्रा.वेद प्रकाश ( मार्गदर्शक, युजीसी एमएमटीटीसी , माजी अध्यक्ष,  विद्यापीठ अनुदान आयोग (UGC), दिल्ली, प्रा. डॉ. ए.के. बक्षी ( संस्थापक कुलगुरू, पीडीएम विद्यापीठ बहादूरगढ , माजी कुलगुरू, युपीआरटीओयू अलाहाबाद, माजी कार्यकारी संचालक, तृतीय शिक्षण आयोग, मॉरिशस) , प्रा.बिभूप्रसाद साहू ( प्रमुख, व्यवसाय अर्थशास्त्र विभाग, एसजीटीबी खालसा महाविद्यालय, दिल्ली विद्यापीठ) डॉ. अरुण जुल्का ( प्राध्यापक, वाणिज्य विभाग, महाराजा अग्रसेन महाविद्यालय, दिल्ली विद्यापीठ), डॉ. महेश देशमुख (उपप्राचार्य आणि आयक्यूएसी समन्वयक सोनोपंत दांडेकर पालघर, महाराष्ट्र, भारत ) प्रा.डॉ.दीपक शर्मा ( प्रमुख, रसायन विज्ञान विभाग, महाराजा रणजित सिंग कॉलेज ऑफ प्रोफेशनल सायन्सेस, इंदूर, म.प्र., इंटरनॅशनल सायन्स कम्युनिटी असोसिएशनचे संस्थापक फेलो सदस्य. वैज्ञानिक आणि तांत्रिक शब्दावलीचे समीक्षक, शिक्षण मंत्रालय, भारत सरकार, सोनीसन हर्बल सह सहयोगी आणि सल्लागार)
प्रा.(डॉ.) आशिष शर्मा प्राध्यापक (सांख्यिकी), ख्रिस्त (डिम विद्यापीठ ), दिल्ली एनसीआर कॅम्पस, गाझियाबाद, “गणितीय आणि सांख्यिकी विज्ञान संशोधन जर्नल” इंटरनॅशनल जर्नलचे मुख्य संपादक) , डॉ.महेश एच. कोलतमे (असोसिएट प्रोफेसर आणि संचालक ॲड’, SNDT वुमेन्स युनिव्हर्सिटी सेंटर फॉर होलिस्टिक एज्युकेशन, ट्रेनिंग आणि नॉव्हेल ॲडव्हान्समेंट, सॉफ्ट कोंपोनंट प्रमुख, पीएम-उषा(मेरू) प्रकल्प., पीएच.डी. संशोधन मार्गदर्शक) , डॉ. दीपा वर्मा ( प्रभारी प्राचार्या विवा महाविद्यालय) या मान्यवरांनी ऑनलाईन पद्धतीने व प्रत्यक्ष कार्यशाळेला उपस्थित राहून शिक्षकांना मार्गदर्शन दिले तसेच व्यपस्थापक समिती सदस्य श्रीनिवास पाध्ये, विवा महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या डॉ. दीपा वर्मा, उप प्राचार्या डॉ. प्राजक्ता परांजपे, आयक्युएसी समन्वयक डॉ. रोहन गवाणकर यांच्या उपस्थित कार्यशाळा पार पडली . या कार्यशाळेचे यशस्वी नियोजन कार्यशाळा समिती प्रमुख डॉ. आरती दुबे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. सदर कार्यशाळेला विविध महाविद्यालयांतील शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

या कार्यशाळेत नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP 2020), अध्यापनातील नवीन तंत्रज्ञानाचा वापर, विद्यार्थी केंद्रित अध्यापन पद्धती, मूल्यमापनातील नव्या संकल्पना तसेच डिजिटल साधनांचा प्रभावी वापर या विषयांवर सखोल मार्गदर्शन करण्यात आले. तज्ज्ञ मार्गदर्शकांनी प्रत्यक्ष उदाहरणांच्या आधारे अध्यापन अधिक परिणामकारक कसे करता येईल याचे प्रात्यक्षिकांसह स्पष्टीकरण केले.

मालवीया टीचर्स ट्रेनिंग प्रोग्रामसारख्या उपक्रमांमुळे शिक्षक अधिक सक्षम होत असून त्याचा थेट फायदा विद्यार्थ्यांना होतो,” असे प्रतिपादन केले. मालवीया टीचर्स ट्रेनिंग प्रोग्रामच्या प्रतिनिधींनी आपल्या मार्गदर्शनातून शिक्षकांना करिअर विकास, अध्यापनातील नावीन्यपूर्ण प्रयोग आणि शैक्षणिक संशोधनाकडे वाटचाल करण्यासाठी प्रेरित केले. कार्यशाळेदरम्यान सहभागी शिक्षकांनी प्रश्नोत्तर सत्रात सक्रिय सहभाग घेत आपले अनुभव मांडले. शिक्षकांनी या उपक्रमाचे कौतुक करत भविष्यात अशाच प्रकारच्या अधिक कार्यशाळांचे आयोजन व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. मालवीया टीचर्स ट्रेनिंग प्रोग्राम व विवा महाविद्यालय यांच्या या संयुक्त उपक्रमामुळे शैक्षणिक गुणवत्तेला नवी दिशा मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

विष्णू वामन ठाकूर चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष माननीय श्री. हितेंद्रजी ठाकूर, संस्थेच्या सेक्रेटरी अपर्णा ठाकूर, संस्थेचे खजिनदार शिखर हितेंद्रजी ठाकूर, व्यवस्थापन समितीचे सदस्य संजीव पाटील, संजय पिंगुळकर, एस.एन पाध्ये, विवा महाविद्यालयाचे समन्वयक नारायण कुट्टी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *