‘जस्सी जैसी कोई नही’ फेम बॉलीवूड अभिनेत्री मोना सिंग (Actress Mona Singh) हिने अलिकडेच अंधेरी पूर्व(Andheri East), मरोळ(Marol) येथील तिच्या कोना कोना या रेस्टॉरंटच्या (Kona Kona Restaurant)शाखेचे उद्घाटन केले. २ फेब्रुवारी रोजीच्या एका इंस्टाग्राम पोस्टमध्ये तिने या जागेची एक झलक शेअर केली. हा बार-रेस्टॉरंट जुन्या आठवणींमध्ये रुजलेल्या रेट्रो थीमवर आधारित आहे.

रेस्टॉरंटच्या आतील भागात आपलेसे वाटणारे डिझाइन उबदार रंगांच्या पैलूसह मनाला एक शांतता देते. विंटेज कॅफेचा मूड गप्पांची मैफल जमविण्यासाठी उत्तम आहे. प्रकाशयोजना अफलातून आहे. छतावरून लटकलेले नारंगी पेंडेंट दिवे वेगळे दिसतात.

गडद हिरव्या भिंती, लाकडी टेबल आणि खुर्च्यांमुळे एक माहोल तयार होतो. उघड्या खिडक्यांमधून भरपूर नैसर्गिक प्रकाश देखील आहे. कुंडीतील वनस्पतींनी हिरवळीची झलक दिसते. हे रेस्टॉरंट 80च्या दशकाची आठवण करून देतो.

मोना सिंग शेवटची जानेवारी २०२६ मध्ये अनुराग सिंग(Anurag Singh) यांच्या ‘बॉर्डर २'(Border 2) मध्ये आणि नोव्हेंबर २०२५ मध्ये आर्यन खानच्या(Aryan Khan) ‘द बॅड्स ऑफ बास्टर्ड’ (The Bads of Bollywood) या वेबसिरीज मध्ये दिसली होती. ‘जस्सी जस्सी कोई नही'(Jassi Jaisi Koi Nahi) मधील तिच्या भूमिकेमुळे ती घराघरात लोकप्रिय झाली. अलीकडेच ती ‘लाल सिंग चड्ढा’ (Lal Singh Chadhdha) आणि ‘मुंज्या'(Munjya) मध्येही दिसली होती.
