अंधेरी- मरोळ येथील हिंदू नववर्ष स्वागत समिती आषाढी एकादशी निमित्त दरवर्षी दिंडी पालखी सोहळा आयोजित करते. यंदा हा सोहळा रविवार, 6 जुलै 2025 रोजी सायंकाळी 6 वाजता साजरा होणार आहे.
पंढरीची वारी ही महाराष्ट्राची ओळख आहे. आपल्या विठूरायाच्या दर्शनासाठी लाखो वारकरी पंढरीला पायी चालत जातात. आषाढी एकादशी निमित्त विविध ठिकाणी दिंडी पालखी सोहळा आयोजित केला जातो. हिंदू नववर्ष स्वागत समिती देखील दरवर्षी या सोहळ्याचे आयोजन करते. यंदा हा सोहळा भारत वन गार्डन,बामण दया पाडा ते स्वयंभू पालेश्वर मंदिर,मरोळ गाव येथे संपन्न होणार आहे.
भाविकांनी मोठ्या संख्येने या दिंडीत सहभागी आपल्या विठूरायाचे मनोमन दर्शन घ्यावे, असे आवाहन हिंदू नववर्ष स्वागत समितीचे संस्थापक अध्यक्ष उमेश सूर्यकांत राणे यांनी केले आहे.





