मुंबई – मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या मैदानात यंदा अनेक सुशिक्षित चेहरे दिसत आहेत. सध्या अशीच चर्चा आहे वांद्रे (Bandra) येथील डॉ. सचिन तांबे यांची. प्रभाग क्र.93 म्हणजे वांद्रे येथील सिद्धार्थ नगर, कलानगर, शासकीय कर्मचारी वसाहत परिसर. हा प्रभाग अनुसूचित जातीसाठी (Scheduled Caste) राखीव आहे. शिवसेना शिंदे गटाच्या रोहिणी कांबळे, कॉँग्रेसचे (Congress) शरद शेजवळ आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे(NCP) डॉ. सचिन तांबे यांच्यामध्ये तिरंगी लढत अपेक्षित आहे.
डॉ.सचिन तांबे हे या परिसरातून अनुसूचित जाती मधून डेंटिस्ट(Dentist) झालेले पहिले व्यक्ती आहेत. आर्थिकदृष्ट्या प्रतिकूल परिस्थिती मधून त्यांनी जिद्दीने अभ्यास केला. पैसे नसल्याने वेळप्रसंगी इतर विद्यार्थ्यांची जुनी पुस्तके वाचून त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. बीडीएस(BDS) ही वैद्यकीय पदवी संपादन केली, अशी माहिती डॉ. तांबे यांचे मित्र स्वप्नील कांबळे यांनी दिली.
या परिसरात झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प(SRA) सुरू असताना बांधकाम व्यावसायिकाने दिलेल्या शब्दाप्रमाणे बुद्ध विहार बांधून दिले नाही म्हणून डॉ. तांबे यांनी मोठे आंदोलन उभारले. एसआरए अधिनियमांची पुस्तके आणून अभ्यास केला. कायदेशीर लढा उभारला. त्यांच्या लढ्याला यश आले. बुद्ध विहार(Buddha Vihar) नियमानुसार उभे राहिले.
जुलै 2005 ला ढगफुटी होऊन मुंबईला महापूर आला होता. मिठी नदीचे मानवी हस्तक्षेपामुळे नाल्यात रूपांतर केल्याने देखील मोठी हानी झाली होती. मिठी नदी भोवती संरक्षित भिंत उभारण्याचा निर्णय तत्कालिन प्रशासनाने घेतला होता. त्या घटनेस वीस वर्षे उलटून देखील भिंत उभी राहिली नाही. त्याचा देखील पाठपुरावा डॉ. सचिन तांबे करत आहेत.
शासकीय कर्मचारी वसाहत परिसराजवळ उच्च न्यायालयाची इमारत उभी राहणार आहे. न्यायालयीन कामामुळे येथील वर्दळ वाढणार असून विविध उद्योग व्यवसाय याठिकाणी उभे राहू शकतात हे डॉ. तांबे यांनी हेरले आहे. प्रभागातील महिलांना या ठिकाणी विविध उद्योग उभारण्यासाठी आवश्यक ती मदत करण्याचा तांबे यांचा मानस आहे.
याच प्रभागामध्ये मुंबई क्रिकेट क्लबचे(MIG) मैदान आहे. फक्त क्रिकेटच नव्हे तर कोणत्याही खेळातील गुणवान खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळता यावे यासाठी आवश्यक ती पायाभूत सुविधा पुरविण्याची त्यांची इच्छा आहे. तळागळातील लोकांमधून क्रीडापटू निर्माण करण्याचा त्यांचा ध्यास आहे.
पुस्तके वाचणे (book reading) हा डॉ. तांबे यांचा छंद आहे. ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर अँड हिज स्पीचेस'(Dr.Babasaheb Ambedkar) हे त्यांचे आवडते पुस्तक आहे.
सविस्तर मुलाखतीसाठी पहा.
