मुंबई- महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाणदिनी आदरांजली वाहण्यासाठी देशभरातून लाखो अनुयायी मुंबई मध्ये आले आहेत. या आंबेडकर अनुयायांना दंत तपासणी सेवा देण्यासाठी कामोठे, नवी मुंबई येथील जिजाऊ डेंटल क्लिनिकच्या दंतवैद्यक डॉ. प्रज्ञा प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली एक दिवसीय `मोफत दंत तपासणी शिबिराचे’ आयोजन करण्यात आले आहे. हे तपासणी शिबीर शनिवार, 6 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 8 वाजेपर्यंत मीनाताई ठाकरे पुतळ्यासमोर, शिवाजी पार्क, दादर येथे होणार आहे. सदर शिबिरास भेट द्यावी असे आवाहन डॉ. प्रज्ञा सावंत यांनी केले आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क- 9167335296, 8108105232