ठाणे – सरदार वल्लभ भाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त पदयात्रेचे आयोजन ठाणे येथे दिनांक २२ नोव्हेबर २०२५ रोजी करण्यात आले होते. या पदयात्रेचे उद्घाटन वाहतूक विभागाचे पोलिस उपायुक्त पंकज शिरसाट यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांनी विद्यार्थ्यांना एकतेचे महत्व आणि वाहतुकीच्या नियमांचे पालन या संदर्भात मार्गदर्शन केले. राष्ट्रीय सेवा योजनेचे ठाणे जिल्हा समन्वयक प्रा.जीवन विचारे यांनी यूनिटी मार्च आयोजनामागील पार्श्वभूमी समजावत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.यावेळी माय भारत उपक्रमाच्या ठाणे जिल्हा कार्यक्रम अधिकारी मनिषा शर्मा, ठाणे महानगर पालिका स्वच्छता विभागाचे अधिकारी श्री.लक्ष्मण पुरी,लक्ष्मण चव्हाण उपस्थित होते. सोबतच वाहतूक विभागाच्या सोनार मॅडम,महाविद्यालयाचे उपप्राचार्य सुभाष शिंदे,डॉ.प्रियंवदा टोकेकर,विभाग कार्यक्रम अधिकारी प्रा.नीरज मिश्रा उपस्थित होते.

या संपूर्ण पदयात्रेसाठी ठाणे जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ, क्रीडा अधिकारी सुवर्णा बारटक्के यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.पदयात्रेचे आयोजन ठाण्यातील जोशी बेडेकर महाविद्यालयातून करण्यात आले होते. आयोजनात विद्या प्रसारक मंडळ, आणि प्राचार्या डॉ.सुचित्रा नाईक यांचे मोलाचे सहकार्य लाभले.या पदयात्रेत ठाणे कळवा, मुंब्रा, आणि डोंबिवली विभागातील महाविद्यालयातील एनएसएस, विद्यार्थी पदयात्रेमध्ये सहभागी झाले होते.
या पदयात्रेचे प्रमुख आकर्षण ठरले ते रथयात्रेमध्ये विराजमान झालेले विविध महापुरुषांच्या वेशभूषेतील विद्यार्थी आणि त्याचबरोबर लेझीम पथक होते.या पदयात्रेत एकूण १७ महाविद्यालयातील ६२४ विद्यार्थी, व १८ कार्यक्रम अधिकारी आणि शिक्षक सहभागी झाले होते. पदयात्रेची जबाबदारी ठाण्यातील जोशी बेडेकर महाविद्यालयाकडे होती. महाविद्यालयाचे एनएसएस कार्यक्रम अधिकारी डॉ.विनोद चांदवाणी प्रा.सुदाम अहिरराव,प्रा. रुपेश महाडीक आणि महाविद्यालयाचे एनएसएस विद्यार्थी यांनी आयोजनात महत्त्वाची कामगिरी बजावली. या पदयात्रेनिमित वाहतूक विभागाचे अधिकारी, पोलिस विभाग, ठाणे महानगरपालिका अधिकारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
