WhatsApp Image 2025 07 04 At 11.57.17

विरार : महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग महाराष्ट्र, माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने ‘करिअर कट्टा ‘या उपक्रमा अंतर्गत सोलार सोसायटी ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने व विवा महाविद्यालय यांच्या सहकार्याने सौर ऊर्जा जनजागृती अभियान २०२५ हा उपक्रम राबविण्यात आला. हा उपक्रम २१ जून २०२५ रोजी विरार येथील विवा महाविद्यालयात आयोजित करण्यात आला होता. नुकताच या स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला.

या उपक्रमात महाराष्ट्रातील अनेक महाविद्यालयांचा उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता. या उपक्रमांतर्गत सहभागी ५५५५५ तरुणांना प्रशिक्षण व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. या दोन दिवसीय उपक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्राचे अध्यक्ष श्री. यशवंत शितोळे , डॉ. एस. एस. खरात (प्राचार्य, मॉडर्न कॉलेज गणेशखिंड, पुणे) , विवा महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या डॉ. दीपा वर्मा , उपप्राचार्या डॉ. प्राजक्ता परांजपे, इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

आयोजित स्पर्धेत विवा महाविद्यालयाने घवघवीत यश प्राप्त करून आपले वर्चस्व टिकवून ठेवले आहे. सौर ऊर्जा जनजागृती स्पर्धेत राज्यस्तरीय पातळीवर विवा महाविद्यालयाने प्रथम क्रमांक पटकावला आहे तसेच जिल्हास्तरीय पातळीवर देखील प्रथम निवड झालेले विद्यालय म्हणून विवा महाविद्यालयाचे नाव गौरविण्यात आले. विवा महाविद्यालयातील विद्यार्थिनी दिक्षा जयप्रकाश गोठणकरची जिल्हास्तरीय पातळीवर निवड करण्यात आलेली आहे.