Imran Shaikh

अंधेरी- प्रभाग क्र. 75 (मरोळ) येथील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष (Indian National Congress), वंचित बहुजन आघाडी(Vanchit Bahujan Aghadi), आरपीआय (गवई गट) (RPI), राष्ट्रीय समाज पक्ष यांच्या आघाडीचे उमेदवार इमरान शेख यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे रविवारी सायंकाळी मरोळ(Marol) येथे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या मुंबई प्रदेश अध्यक्षा खासदार प्रा. वर्षा गायकवाड(Varsha Gaikwad) यांच्या हस्ते उदघाटन झाले. यावेळी कॉँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष राजेश शर्मा, उत्तर पश्चिम जिल्हाध्यक्ष श्रीमती भावना जैन, ब्लॉक अध्यक्ष पांडुरंग चव्हाण, वंचित बहुजन आघाडीचे प्रभाग अध्यक्ष विवेक नायगावकर आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.

‘’इमरान शेख यांच्या रूपाने कॉँग्रेस पक्षाने मरोळला एक सुशिक्षित, प्रामाणिक आणि धडाडीचा उमेदवार दिला आहे. स्वच्छ चारित्र्य आणि लोकांसाठी झटण्याची वृत्ती आणि लोकांचा दमदार पाठिंबा लक्षात घेऊन त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे. जर तुम्हांला मरोळचा सर्वांगीण विकास करायचा तर इमरान शेख यांना महापालिकेच्या निवडणुकीत बहुमताने निवडून द्या,’’ असे आवाहन खासदार प्रा. वर्षा गायकवाड यांनी केले.

Imran Shaikh1 1024x683

‘’इमरान शेख यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनास जमलेली ही लोकांची गर्दी पाहून वाटते की मरोळकरांनी इमरान शेख यांनाच आपला नगरसेवक म्हणून निवडले आहे. 16 तारखेला आम्ही विजयाचा गुलाल उधळायला पुन्हा येऊ,’’ असे कॉँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष राजेश शर्मा यांनी म्हटले.     

‘’आज मिळालेला मरोळकरांचा प्रचंड पाठिंबा, वरिष्ठ नेत्यांचे आशीर्वाद आणि सहकारी पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी दिलेले प्रोत्साहन हे माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यासाठी लाखमोलाची गोष्ट आहे. मी मरोळकरांच्या विकासासाठी नेहमीच कटीबद्ध आहे. त्यांचा पाठिंबा पाहून मन भरून आले आहे,’’ असे भावनिक उदगार प्रभाग क्र. 75चे कॉंग्रेस उमेदवार इमरान शेख यांनी काढले.   

प्रभाग क्र. 75 मध्ये शिवसेना उबाठाचे उमेदवार व माजी नगरसेवक प्रमोद सावंत, भाजपाचे उमेदवार उमेश राणे आणि कॉँग्रेसचे उमेदवार इमरान शेख यांच्यात तिरंगी लढत होणार आहे.