अंधेरी- प्रभाग क्र. ७५ मधील भाजप उमेदवार उमेश राणे यांनी प्रचाराचा धडाका लावला आहे. मंगळवारी भाजपाने मरोळ भंडारवाडा येथे स्थानिक नागरिकांची छोटेखानी बैठक घेतली. या बैठकीस आमदार मुरजी पटेल, माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा, शिवसेनेचे रोहन सावंत आणि भाजप, शिवसेना व आरपीयआयचे कार्यकर्ते उपस्थित होते.

उमेश राणे ही प्रामाणिक व्यक्ती आहे. ते कधीच कोणाचा एक रुपया सुद्धा घेणार नाही हा माझा शब्द आहे, असा विश्वास व्यक्त करत आमदार पटेल यांनी मरोळच्या विकासासाठी राणे यांना प्रचंड बहुमताने निवडून देण्याचे आवाहन केले.

उमेश राणे हे तळागाळातील जनतेसाठी झटणारे कार्यकर्ते आहेत. गेली अनेक वर्षे ते मरोळच्या विकासासाठी निरंतर प्रयत्नशील आहेत. अशी व्यक्ती नगरसेवक झाली तर मरोळचा नक्कीच कायापालट होईल, असा आशावाद प्रदीप शर्मा यांनी व्यक्त केला.

मी सामान्य कुटुंबातला एक सामान्य कार्यकर्ता आहे. मरोळमध्येच लहानाचा मोठा झालो. मरोळ गाव हे दोन मेट्रो लाईन मुळे चर्चेत आहे. अनेक उद्योगधंदे, पंचतारांकित हॉटेल्स, कॉर्पोरेट कार्यालय मरोळ मध्ये आहे. मात्र त्या तुलनेत मरोळचा विकास झालेला नाही. मरोळचा विकास आराखडा मला राबवायचा आहे, असे उमेश राणे म्हणाले.

यावेळी मरोळ भंडारवाडा व परिसरातील नागरिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *