अंधेरी- शिवसेना अंधेरी पूर्व विधानसभा तर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त शुक्रवार, ०६ मार्च २०२६ रोजी सार्वजनिक शिवजयंती उत्सव 2026 चे आयोजन करण्यात आले आहे.
शुक्रवारी सकाळी ११.०० वाजता सत्यनारायण महापूजा आयोजित करण्यात आली आहे. सायंकाळी ०६.०० ते रात्री १०.०० वाजेपर्यंत भव्य शोभायात्रा आणि मिरवणूक निघणार आहे. मरोळ मधील जलाराम स्टोअर्स पासून मिरवणुकीला सुरुवात होईल. पुढे ही मिरवणूक मरोळ मरोशी मार्ग ते विजयनगर अशी प्रस्थान करेल.
मिरवणुकीदरम्यान शिवकालीन मर्दानी खेळांचे चित्तथरारक प्रात्यक्षिक सादर करण्यात येणार आहे. सदर मिरवणुकीमध्ये सामील होण्याचे आवाहन आयोजक रोहन सावंत यांनी केले आहे.

