मुंबई शहर व उपनगरात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता
मुंबई: मुंबई महानगरपालिकेने आज सकाळी ‘एक्स’ या माध्यमावरून मुंबईच्या हवामानाचा आढावा प्रसिद्ध केला. या आढाव्यात आज मुंबई शहर व उपनगरात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. रात्री उशिरा किंवा पहाटेच्या सुमारास काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता देखील आहे. तसेच, अधूनमधून ताशी ५० ते ६० किमी वेगाने सोसाट्याचे वारे वाहण्याचीही दाट शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
भरती – ओहोटीच्या वेळा खालीलप्रमाणे:
भरतीची दुपारी ०१:४५ वाजता – ०४:२७ मीटर ओहोटी – सायंकाळी ७:४९ वाजता – १.८२ मीटर
भरती – रात्री ०१: ३१ वाजता – ३.७१ मीटर (उद्या, ३ जुलै २०२६) ओहोटी – सकाळी ७:११ वाजता – ०.८८ मीटर (उद्या, ३ जुलै २०२६)
मुसळधार पावसाच्या वेळी कोणीही समुद्रात जाऊ नये.
