shravandhara viva

२८५ स्पर्धकांचा सहभाग; ग्रंथालय ठरले सर्जनशीलतेचे व्यासपीठ

विरार, दि. २१ ऑगस्ट २०२६ : विवा महाविद्यालयाच्या ग्रंथालय विभागातर्फे विद्यार्थ्यांमधील सर्जनशीलता, कलागुण, आत्मविश्वास, नेतृत्वगुण आणि सांघिक भावना यांना चालना देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या ‘श्रावणधारा २०२६’ या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दि. १७ ऑगस्ट ते २० ऑगस्ट २०२६ रोजी विविध स्पर्धा आणि नावीन्यपूर्ण उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमासाठी विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी अशा तिन्ही गटांतील तब्बल २८५ स्पर्धकांनी सहभाग नोंदविला.

या उपक्रमाची सांगता व पारितोषिक वितरण समारंभ दि. २० ऑगस्ट २०२६ रोजी महाविद्यालयाच्या ग्रंथालयातील वाचन कक्षात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. विवा महाविद्यालयाच्या उपप्राचार्या डॉ. प्राजक्ता परांजपे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. ग्रंथपाल डॉ. नागरत्ना पलोटी यांनी प्रास्ताविकातून ‘श्रावणधारा’ उपक्रमामागील उद्देश आणि विविध उपक्रमांची माहिती दिली तसेच सूत्रसंचालन अंजली परांजपे यांनी केले. विवा अप्लाइड आर्टचे डॉ. वृषाली निंबरे, सहाय्यक प्राध्यापक नकुल सुतार, सहाय्यक प्राध्यापक राकेश कदम, सहाय्यक प्राध्यापक प्रतीक घायसस, सहाय्यक प्राध्यापक प्रफुल्ल सुतार या मान्यवरांचे ‘Paint My Umbrella’ या एकदिवसीय सर्जनशील कार्यशाळेला अमूल्य मार्गदर्शन लाभले.

ग्रंथालय म्हटले की केवळ पुस्तके, वाचन आणि अभ्यास असे पारंपरिक चित्र डोळ्यासमोर येते. मात्र, ग्रंथालयाची भूमिका केवळ ज्ञानार्जनापुरती मर्यादित नसून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठीही ते महत्त्वाचे व्यासपीठ ठरू शकते, हे ‘श्रावणधारा’ उपक्रमातून अधोरेखित झाले. विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुणांना अभिव्यक्तीची संधी मिळावी, या उद्देशाने ग्रंथालय विभागातर्फे दरवर्षी विविध नावीन्यपूर्ण उपक्रम राबविले जातात.

shravandhara viva1

‘श्रावणधारा २०२६’ अंतर्गत कथाकथन, राखी मेकिंग, सीड पोर्ट्रेट आणि निबंध लेखन अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. तसेच २८५ स्पर्धकांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. विवा इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाइड आर्ट्सच्या सहकार्याने ‘Paint My Umbrella’ या एकदिवसीय सर्जनशील कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेसाठीही २६ जणांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

या कार्यक्रमास विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. नॉलेज बीज कमिटीचे सदस्य, ग्रंथालय विभागातील सदस्य व महाविद्यालयाचे विद्यार्थी कृष्णा पांडे यांनी आभार प्रदर्शन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *