glass in burger

महिलेच्या कुटुंबीयांची पोलिस आणि अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रार

अंधेरी: अंधेरीतील एका रेस्टॉरंटमध्ये बर्गर खात असताना त्यामध्ये काचेचा तुकडा आढळल्याचा धक्कादायक आरोप एका महिलेने केला आहे. या घटनेनंतर महिलेच्या कुटुंबीयांनी पोलिसांकडे तक्रार दाखल करण्याबरोबरच अन्न व औषध प्रशासनाकडेही (FDA) दाद मागितली आहे.

ही घटना १६ ऑगस्ट रोजी घडल्याचे समोर आले आहे. तनिषा गोगरी या मैत्रिणीसोबत अंधेरीतील Jimis Burger येथे गेल्या होत्या. त्यांनी तेथे Korean Veg Burger ऑर्डर केला. बर्गर खात असताना त्यामध्ये काचेचा तुकडा आढळल्याचा त्यांचा दावा आहे.

तनिषा यांनी तातडीने रेस्टॉरंटच्या व्यवस्थापनाला या प्रकाराची माहिती दिली. मात्र, त्यांच्या आरोपानुसार, रेस्टॉरंट व्यवस्थापनाने बर्गरमधून सापडलेला कथित काचेचा तुकडा तपासणीसाठी जतन न करता कचरापेटीत टाकून दिला.

glass fragment in burger

या प्रकारामुळे संतप्त झालेल्या तनिषा यांच्या वडिलांनी अंबोली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तसेच अन्नपदार्थांच्या सुरक्षिततेबाबत कारवाई करण्याची मागणी करत कुटुंबीयांनी FDA कडेही तक्रार केली.

या तक्रारीची पोलिस आणि अन्नसुरक्षा अधिकाऱ्यांकडून दखल घेण्यात आली असून, प्रकरणाची चौकशी सुरू आहे. मात्र, बर्गरमध्ये प्रत्यक्षात काचेचा तुकडा होता की नाही, याची स्वतंत्रपणे पुष्टी अद्याप झालेली नाही. संबंधित रेस्टॉरंटकडून या आरोपांवर अधिकृत प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नसल्याचे मनीकंट्रोल च्या वृत्तात म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *