WhatsApp Image 2026 02 27 At 12.54.45

अंधेरी – थोर क्रांतिकारी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुण्यतिथी निमित्त गुरुवार, २६ फेब्रुवारी रोजी मरोळ येथील सावरकर संकूल, कदम वाडी येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला जनकल्याण सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोष केळकर आणि इतिहास संशोधक व लेखिका डॉ. आसावरी बापट, भाजप नेते उमेश राणे उपस्थित होते.

या कार्यक्रमावेळी लेखिका आसावरी बापट यांचा जीवनपट उलगडला. सावरकर आणि त्यांचे कुटुंब यांनी देशासाठी केलेल्या त्यागाचे त्यांनी विवेचन केले. संजय केळकर यांनी आजच्या काळात सावरकरांचे विचार किती महत्वाचे आहेत, हे तपशीलवार मांडले.

WhatsApp Image 2026 02 27 At 12.54.46 1024x772

”स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे अवघे जीवनमान प्रेरणादायी आहे. एक व्यक्ती इतक्या ज्वलंत विचारांची असू शकते याचं उत्तम उदाहरण म्हणजे सावरकर होय. जगात सर्वांत जास्त तरुण भारतात आहेत. या तरुणांनी सावरकरांची दृष्टी, अभ्यास, त्याग, बलिदान हे गुण आत्मसात केले तर आपला भारत देश जगात सर्वोत्तम देश होईल”,

असे प्रतिपादन कार्यक्रमाचे आयोजक उमेश राणे यांनी केले.

यावेळी मरोळमधील सावरकरप्रेमी नागरिकांनी या कार्यक्रमाचा आस्वाद घेतला.