मुंबई: अंधेरी-दहिसर(Andheri Dahisar) मार्गावरील मेट्रो लाईन ७(Mumbai Metro Line 7) ट्रेन गुरुवारी, १९ फेब्रुवारी रोजी गुंदवली स्टेशनवर सुमारे १५ मिनिटे थांबली. परिणामी गर्दीच्या वेळेत ऑफिस प्रवासादरम्यान प्रवाशांना प्रचंड त्रास झाला. वृत्तानुसार, ही घटना सकाळी ११ वाजता घडली.

शिवजयंती निमित्त शासकीय- निमशासकीय कार्यालयांना, शाळा-महाविद्यालयांना सुट्टी होती. मात्र खासगी आस्थापने सुरू होते. मेट्रो सेवा अचानक थांबवल्यामुळे स्टेशनवर मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली. सध्या, महा मुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन (MMMOCL) कडून या बिघाडाचे कारण काय आहे याबद्दल कोणतीही माहिती नाही.

गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये, मुंबईच्या वर्सोवा-घाटकोपर मेट्रो कॉरिडॉर (मुंबई मेट्रो वन) मध्ये तांत्रिक बिघाड झाला होता, ज्यामुळे सेवा उशिरा सुरू झाल्या आणि अनेक स्थानकांवर गर्दी वाढली. वर्सोवा आणि आझाद नगर दरम्यान हा बिघाड झाला, ज्यामुळे प्रवासी अडकले आणि सोशल मीडियावर तक्रारींचा भडका उडाला.