who is aditya ram shankar (1)

लग्नाचे खोटे आश्वासन देऊन लैंगिक शोषण केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी गायक आदित्य राम शंकरविरोधात एफआयआर दाखल केला आहे.

जुहू पोलिसांनी गायक आणि संगीतकार आदित्य राम शंकरविरोधात लग्नाचे खोटे आश्वासन देऊन एका महिलेचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. भारतीय न्याय संहिता (बीएनएस) च्या कलम ६९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपास सुरू आहे.

जुहू पोलीस ठाण्यातील एका पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, तपासाचा भाग म्हणून आरोपीला लवकरच नोटीस बजावण्यात येईल आणि चौकशीसाठी बोलावण्यात येईल.

तक्रारदार महिलेनुसार, सुमारे एक वर्षापूर्वी एका ओळखीच्या मित्राच्या माध्यमातून तिचा आदित्य राम शंकरशी संपर्क आला. हळूहळू मैत्री वाढली, त्यानंतर आरोपीने तिला जुहू येथील एका हॉटेलमध्ये नेले आणि लग्नाचे आश्वासन देऊन तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले.

महिलांनी आरोप केला आहे की, आदित्यने लग्नाचे आश्वासन देत दीर्घकाळ तिच्याशी वारंवार लैंगिक संबंध ठेवले. मात्र, जेव्हा जेव्हा तिने लग्नाचा विषय काढला, तेव्हा त्याने स्पष्ट उत्तर देणे टाळले. तक्रारीनुसार, यावर्षी २५ मे रोजी त्या महिलेने पुन्हा एकदा आदित्य आणि त्याच्या कुटुंबीयांना त्यांच्या लग्नाच्या योजनांबद्दल विचारले. तेव्हाच त्याने तिला सांगितले की, ती वेगळ्या जातीची असल्यामुळे लग्न शक्य होणार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *