Viva College Tree Plantation

गुरुपौर्णिमेनिमित्त द्वारकाधीश मंदिर परिसरात सीड बॉल व वृक्षारोपण उपक्रम उत्साहात संपन्न

विरार : पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून विवा महाविद्यालयाच्या बीएएमएमसी विभागाच्या वतीने द्वारकाधीश मंदिर परिसरात सीड बॉल व वृक्षारोपण उपक्रम उत्साहात पार पडला. विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेत परिसर हरित करण्याचा संकल्प केला.

या उपक्रमाला वसई-विरार महानगरपालिकेच्या महापौर प्रविणा हितेंद्र ठाकूर तसेच संस्थेचे खजिनदार शिखर हितेंद्र ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांनी विद्यार्थ्यांच्या पर्यावरण संवर्धनासाठीच्या या अभिनव उपक्रमाचे कौतुक केले. प्रत्येकाने वृक्षलागवड व वृक्षसंवर्धनाची जबाबदारी स्वीकारण्याचे आवाहन प्रविणा हितेंद्र ठाकूर यांनी केले. या हरित उपक्रमात एकंदरित जांभूळ, चिक्कू, आंबा, फणस, अशा विविध १०२ फळ झाड – बियांची लागवड करण्यात आली .

whatsapp image 2026 07 30 at 13.30.22

या उपक्रमात १०२ विद्यार्थांनी उत्सूर्फपणे सहभाग नोंदवला. बीएएमएमसी विभाग प्रमुख शाहीन महिडा यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच प्रा. मोहसीन शेख यांच्या नेतृत्वाखाली आयोजित या उपक्रमात प्रा. तृप्ती पाटील, डॉ. एलिना गोंसालविस, प्रा. रुकसार शेख, प्रा. महेश जगताप, प्रा. प्रवीण पाटील, प्रा. बाळकृष्ण अईर तसेच विभागातील विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले.

गुरुपौर्णिमेच्या पावन पर्वावर निसर्गालाच गुरू मानत विद्यार्थ्यांनी सीड बॉलचे रोपण व वृक्षारोपण करून पर्यावरण संरक्षणाची सामूहिक शपथ घेतली. भविष्यातही अशा पर्यावरणपूरक उपक्रमांद्वारे समाजात हरित संदेश पोहोचविण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. हा उपक्रम सामाजिक बांधिलकी, पर्यावरणप्रेम आणि विद्यार्थी सहभाग यांचे प्रेरणादायी उदाहरण ठरला. हा हरित उपक्रम विद्यार्थ्यांना पर्यावरण संरक्षणाचे महत्त्व, सामाजिक बांधिलकी अधोरेखित करणारा ठरला.

या उपक्रमाला विष्णू वामन ठाकूर चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष मा. हितेंद्रजी ठाकूर, संस्थेच्या सेक्रेटरी अपर्णा ठाकूर, व्यवस्थापन समितीचे सदस्य संजीव पाटील, संजय पिंगुळकर, एस. एन. पाध्ये, विवा महाविद्यालयाचे समन्वयक नारायण कुट्टी, उपप्राचार्या डॉ. प्राजक्ता परांजपे आणि प्रभारी प्राचार्या डॉ. दीपा वर्मा यांनी मोलाचे सहाय्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *