marol Dindi

टाळ मृदुंगाच्या तालावर धरला हरिनामाचा ठेका

अंधेरी- मरोळ येथील हिंदू नववर्ष स्वागत समिती आषाढी एकादशी निमित्त 25 जुलै रोजी दिंडी पालखी सोहळ्याचे आयोजन केले होते. या दिंडीचे वैशिष्ट्य म्हणजे मुंबईच्या महापौर रितू तावडे या दिंडी सोहळ्यात सहभागी झाल्या होत्या. त्यांच्या हस्ते पालखीचे पूजन झाले. महापौरांनी स्वतः हातात टाळ वीणा घेऊन हरिनाम संकीर्तन केले.

हा सोहळा भारत वन गार्डनपासून सुरू झाला. या सोहळ्यात पुरुषांनी पांढरा सदरा-लेंगा व भगवे उपरणे परिधान केले होते. महिला नऊवारी साडी नेसून डोईवर तुळशी वृंदावन घेऊन सहभागी दिंडी मध्ये सहभागी झाल्या होत्या. तर पुरुषांनी टाळ मृदुंगाच्या गजरात हरीनामाचा गजर केला होता.

भारतवन गार्डन, बामनदाया पाडा ते स्वयंभू पालेश्वर मंदिर, मरोळ पर्यंत दिंडी पालखीचे मार्गक्रमण झाले. स्वयंभू पालेश्वर मंदिरात दिंडीचा आरतीने समारोप झाला. यावेळी प्रसाद वाटप झाले. आमदार मुरजी पटेल हे आरतीला उपस्थित होते. या दिंडीमध्ये आबालवृद्ध मरोळकर सामील झाले होते. ग्यानबा- तुकाराम, विठ्ठल विठ्ठल नामाने आसमंत दुमदुमला.

या सोहळ्याचे आयोजक उमेश राणे यांनी सांगितले की,

हिंदू नववर्ष स्वागत समिती आषाढी एकादशी निमित्त दरवर्षी दिंडी पालखी सोहळ्याचे आयोजन करते. प्रत्येकालाच पंढरपूरला जाऊन विठू माऊलीचे दर्शन घेणे शक्य होत नाही. मरोळच्या दिंडी मध्ये सहभागी होऊन वारीची अनुभूती मिळते. दरवर्षी शेकडो मरोळकर दिंडी मध्ये सहभागी होतात. यावर्षी आपल्या महापौर रितूताई तावडे या दिंडी मध्ये सहभागी झाल्या. दिंडी मधील भविकांसोबत त्यांनी देखील टाळ- चिपळ्यांचा नाद करत हरीनामाचा गजर केला. आमदार मुरजी पटेल हे देखील दरवर्षी प्रमाणे दिंडी मध्ये सहभागी झाले होते. यावर्षीचा दिंडी सोहळा या दोन महनीय व्यक्तींमुळे संस्मरणीय ठरला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *